स्पिकरचा आवाज कमी करायला सांगितल्याने मांजरीत बेदम मारहाण
तरुणांची एकाला दांडक्याने बेदम मारहाण, परिसरात पसरवली दहशत, गणपती मिरवणुकीत वाद
पुणे दि २७(प्रतिनिधी)- पुण्यात अलीकडच्या काळात गुन्हेगारीत वाढ झाली आहे. किरकोळ वादातून हाणामारी करणे शिवीगाळी करणे अश्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. सध्या पुण्यात गणेश उत्सवाची धामधूम सुरु आहे. अशातच हडपसर परिसरातून एक धक्कादायक बातमी सुरु झाली आहे. विसर्जन मिरवणुकीत स्पीकरचा आवाज कमी करण्यास सांगितल्याने एकास दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना मांजरीत घडली आहे.
हर्षल सुरेश घुले असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी स्वप्नील उर्फ बिट्या संजय कुचेकर, कैलास संतोष घुले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळासाहेब वसंत घुले यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी स्वप्निल ऊर्फ बिबट्या कुचेकर याचे मांजरी येथे वेताळबाबा गणपती मंडळ आहे. त्याच्या मंडळाची रविवारी विसर्जन मिरवणूक निघाली होती. त्यांनी मांजरी भागात विसर्जन मिरवणूक काढली होती. स्पीकरचा आवाज मोठा असल्याने बाळासाहेब घुले आणि कुटुंबीयांनी आरोपींना आवाज कमी करण्यास सांगितले. पण आरोपींनी घुले, त्यांची पत्नी आणि शेजाऱ्यांना शिवीगाळ केली. त्यामुळे घुले यांनी पोलीस नियंत्रण कक्षात तक्रार दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना समज दिली. काही वेळानंतर पोलीस तेथून निघून गेले. आरोपी हर्षल, स्वप्नील, कैलास यांनी घुले यांना पुन्हा शिवीगाळ केली. एवढेच नाही तर त्यांनी त्यांना लाकडी दांडक्याने घुले यांना बेदम मारहाण केली. तसेच दांडके उगारुन परिसरात दहशत देखील माजविली होती.
याप्रकरणी बाळासाहेब घुले यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार हडपसर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही आरोपी फरार आहेत. सहायक पोलिस निरीक्षक दाभाडे तपास करीत आहेत.