Latest Marathi News
Ganesh J GIF

‘बिल्डर, मंत्री, आमदार कोणीही असो’ ; मुख्यमंत्र्यांचा पुणे पोलीस आयुक्तांना मोठा आदेश

पुणे हिट अँड रन प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होते आहेत. या प्रकरणात एकाच कुटुंबातील तीन पिढ्या तुरुंगात आहेत. अल्पवयीन आरोपी बड्या बिल्डरचा मुलगा असल्याने त्याला वाचवण्यासाठी कायदा, नियमांना धाब्यावर बसवण्याचा प्रयत्न झालाय.आधी आरोपीचा गुन्हा आपल्या डोक्यावर घ्यावा यासाठी ड्रायव्हरला आरोपीच्या आजोबांनी डांबून ठेवलं. त्याला पैसा, बंगला अशी आमिष दाखवली. ड्रायव्हरच्या पत्नीमुळे हा सर्व प्रकार उघड झाला. ड्रायव्हरने सुद्धा गुन्हा अंगावर घेण्यासाठी आपल्यावर दबाव टाकल्याची कबुली दिली. यासाठी आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल पोलीस कोठडीत आहेत. त्यानंतर पुण्याच्या ससून रुग्णालयातील दोन डॉक्टर्सना अटक करण्यात आली.

आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलण्यात आले होते. आरोपीचे बल्ड सॅम्पल चक्क कचऱ्याच्या डब्ब्यात फेकण्यात आलं. अल्पवयीन आरोपीने आपल्या भरधाव पोर्शे कारने दुचाकीला उडवलं. यात तरुण-तरुणीचा मृत्यू झाला. घटनेच्यावेळी आरोपी दारुच्या नशेत होता. पब पार्टीमध्ये तो दारु पित असल्याचे फोटो सुद्धा समोर आले होते. ब्लड सॅम्पलमुळे आरोपी घटनेच्यावेळी दारुच्या नशेत होता की, नाही? हे समजणार होतं. त्यामुळे चक्क ब्लड सॅम्पल बदलण्याचा प्रयत्न झाला. आता या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी चर्चा केलीय.

पुणे अपघात प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे पोलीस आयुक्तांशी चर्चा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 10 मिनिटं पुणे पोलीस आयुक्तांशी बोलले. पुणे हिट एंड रन प्रकरणांमध्ये आरोपींची सखोल चौकशी करा. या प्रकरणात सामील असलेल्या शेवटच्या आरोपीपर्यंत पोहोचण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुणे पोलीस आयुक्तांना थेट निर्देश.या प्रकरणात संघटीत गुन्हेगारीचे कलम वाढवता येईल का? यावरही वरिष्ट पातळीवर विचार सुरू आहे. बिल्डर, मंत्री, आमदार, खासदार कुणाचाही सहभाग असल्यास या प्रकरणात त्यांना ही आरोपी करा. समाजात या प्रकरणाच्या माध्यमातून चांगला संदेश जायला हवा असे मुख्यमंत्र्यांकडून पोलीस आयुक्तांना निर्देश देण्यात आले आहेत. दरे गावातून निघाल्यानंतर मुख्यमंत्री पुण्यात घटनास्थळी जाऊन या प्रकरणाची व्याप्ती पाहणार असल्याचीही सूत्रांची माहिती.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!