Latest Marathi News
Ganesh J GIF

कसबा चिंचवड पोटनिवडणूकीत उमेदवारांनी केला ‘इतका’ खर्च

या उमेदवाराने खर्चात घेतली आघाडी, कोणत्या उमेदवाराचा किती खर्च, बघा यादी

पुणे दि २६(प्रतिनिधी)- पिंपरी चिंचवड आणि कसबा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. पण त्याचवेळी कोणत्या उमेदवाराने किती खर्च केला याची आकडेवारी समोर आली आहे. पण समोर आलेल्या माहितीनुसार त्यांनी खर्च करताना हात आखडता घेतल्याचे दिसून आले आहे.

कसबा मतदारसंघातील निवडणूक रिंगणात १६ उमेदवार होते. तर या निवडणूकीसाठी खर्चाची मर्यादा ४० लाख रुपये होती. यात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी सर्वाधिक ११ लाख ६० हजार २९ रुपये खर्च केला आहे. भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी ८ लाख ९४ हजार १७६ रुपये खर्च केला आहे. तर पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे विठ्ठल उर्फ नाना काटे २५ लाख ५९ हजार ५९६ लाखांचा खर्च केला आहे. तर भारतीय जनता पक्षाच्या अश्विनी जगताप यांनी २४ लाख २३ हजार ९१४ प्रचार खर्च केला आहे. तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी प्रचारासाठी २२ लाख ५७ हजार ९८७ रुपये खर्च करुन आघाडी घेतली आहे. त्यामुळे चिंचवडमध्ये तिरंगी लढत होताना खर्चातही दिसून आले आहे. या निवडणूकीत सर्वात कमी खर्च अपक्ष उमेदवार चंद्रकांत मोटे यांनी केला असून त्यांनी केवळ ५ हजार ९०६ रुपये खर्च केला आहे. तर सर्व उमेदवारांनी मिळून १४ कोटी १० लाख ९६ हजार रुपये खर्च केला आहे.

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने उमेदवारांसाठी निवडणूक खर्चाची मर्यादा ४० लाख रुपये केली होती. या अगोदर २०१९ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ही मर्यादा २८ लाख रुपये होती. परंतु पोटनिवडणुकीसाठी त्यात वाढ करण्यात आली होती. त्यामुळे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी ४० लाख हीच मर्यादा कायम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!