Just another WordPress site

म्हणून विद्यार्थ्याने शिक्षेकेला केली लाथाबुक्क्यांनी मारहाण

शिक्षिकेला मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल, विद्यार्थ्याची रवानगी बाल सुधारगृहात

मुंबई दि २६(प्रतिनिधी)- गुरु आणि शिष्याचे नाते सर्वात पवित्र मानले जाते. कारण गुरुबद्दल प्रत्येकाच्या मनात एक आदराची भावना असते. पण आजच्या काळात याच्या उलट पहायला मिळत आहे. आज गुरु आणि शिक्षक यांच्यात आदर राहिलेला उलट शिक्षकांवरच हल्ला होण्याच्या घटना घडल्या आहेत.

सध्या सोशल मिडीयावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे यात एका हायस्कूलमध्ये मुले वर्गात गेम खेळत बसले होते. त्यामुळे एका शिक्षिकेने त्यांना गेम खेळू नका असे सांगितले.आणि हातातून गेम हिसकावून घेतला. शिक्षेकेने आपला व्हिडीओ गेम घेतल्यामुळे विद्यार्थ्याला राग आला आणि त्याने थेट शिक्षिकेवरच हल्ला केला. यावेळी त्याने अक्षरशः लाथा बुक्यांनी शिक्षिकेला मारत होता. त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न काही जणांनी केला पण तो कोणालाही आवरत नव्हता. हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना फ्लोरिडातील मॅटेंजा हायस्कूलमधील घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी विद्यार्थ्याला अटक करुन त्याची रवानगी बाल न्याय विभागात केली आहे.

GIF Advt

व्हायरल व्हिडीओ @FightHaven या ट्विटर अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहेत. आतापर्यंत या व्हिडीओला १ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. पण या व्हायरल व्हिडिओमुळे विद्यार्थ्यांचे रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी समुपदेशनची गरज असल्याचे बोलले जात आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!