Latest Marathi News
Ganesh J GIF

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार सुप्रिया सुळेंची डोकेदुखी वाढली, बघा काय आहे प्रकरण, पक्षीय वाद चिघळला

पुणे दि २३ (प्रतिनिधी)- पुण्यातील राष्ट्रवादीचे नगरसेवक सचिन दोडके यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दोडके यांनी भाजप कार्यकर्त्यांना मारहाण तसेच शिवीगाळ करून धमकी दिल्याची माहिती आहे. या प्रकरणातून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोडके यांच्यासह ५ -६ कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

वारजे पोलिस ठाण्यात भाजप चे कार्यकर्ते वासुदेव भोसले यांनी फिर्याद दिली आहे. पुणे शहरातील वारजे भागात गेल्या अनेक वर्षांपासून सचिन दोडके नगरसेवक आहेत. फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मंगळवारी वारजे भागात असलेल्या आर एम डी कॉलेज ते साई सयाजी नगर येथे एक अंडरपस (बोगदा) आहे. त्या ठिकाणी खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्या निधीतून काही काम चालू असलेल्या ठिकाणी सचिन दोडके, संजय दोडके आणि त्यांचे इतर कार्यकर्ते पोहचले. त्यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली आणि यातच संजय दोडके यांनी हातात बांबू घेऊन फिर्यादी यांच्या अंगावर जाऊन जिवे मारण्याची धमकी दिली. तिथे सुरू असलेल्या कामगारांना सुद्धा मारहाण केल्याचा आरोप फिर्यादी यांनी केला आहे. सचिन दोडेक हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे निकवर्तीय म्हणून देखील ओळखले जातात. पोलीस उपनिरीक्षक मुंढे तपास करत आहेत.

सचिन दोडेक हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय म्हणून देखील ओळखले जातात. यामुळे त्यांनी नेमकी का मारहाण केली ? याचा तपास पोलीस करत आहे. मात्र राजकारणाऱ्यांनीच अशा प्रकारे दहशत निर्माण केल्यास लोकप्रतिनिधींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!