Latest Marathi News
Ganesh J GIF

संघर्षाच्या दिवसात या अभिनेत्रीला ‘इतका’ होता पहिला पगार

संस्कारी सुनेचे नवीन फोटो चर्चेत, वैवाहिक आयुष्यावरही केले भाष्य, बघा काय म्हणाली

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- बिगबाॅसमुळे घराघरात लोकप्रिय असलेली अभिनेत्री म्हणजे रश्मी देसाई आत्तापर्यंत तिने अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. एका मुलाखती दरम्यान अभिनेत्री रश्मी देसाईने तिच्या स्ट्रगलच्या दिवसांच्या आठवणीत काही गोष्टी शेअर केल्या आहेत.

रश्मी देसाईने या मुलाखतीत आपला पगार सांगितले आहे. ती म्हणाली, ‘मी माझ्या करिअरला लहान वयात सुरुवात केली कारण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. मी सर्व काही करण्याचा प्रयत्न करत आहे. मला आनंद आहे की आता माझ्या कामात स्थैर्य आहे आणि मला चांगले काम करायचे आहे. अभिनेत्री म्हणून माझी स्वप्ने अजून पूर्ण व्हायची आहेत, त्या दिशेने मी काम करत आहे. यावेळी तिने आपला पहिला पगार सांगितला आहे. रश्मी देसाईचा पहिला पगार ३५० रुपये होता. आज रश्मी यशस्वी असली तरी सुरूवातीला तिने खुप संघर्ष केला आहे. तिच्यात आणि तिच्या आईमध्ये खूप मतभेद झाले होते. त्याचबरोबर रश्मीच्या वैवाहिक आयुष्यातही अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र तरीही सगळ्या संकटावर मात करत ती आज यशाच्या शिखरावर पोहचली आहे. ती म्हणाली “माझ्यामध्ये आणि आईमध्ये मोठे वाद झाले. हे वाद इतके वाढले की आमचे बोलणे सुद्धा बंद झाले होते. या संकटाच्या वेळी मला जीव लावायला कोणीतरी हवं होतं.  माझ्यावर खूप जबाबदारी होती आणि मला ती पार पाडायची होती. बिग बॉसच्या कार्यक्रमाने मला सगळे दिले. माझ्यात आणि आईमध्ये झालेले वादसुद्धा मिटले.” असे ती म्हणाली आहे. यावेळी ती वैवाहिक आयुष्यावर देखील बोलली आहे.

रश्मी देसाई आपल्या बोल्ड आणि बिनधास्त शैलीमुळे सर्वत्र लोकप्रिय आहे. ‘उतरन’ मालिकेतील दमदार भूमिकेने तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. रश्मीने ‘दिल से दिल तक’, ‘अधूरी कहाणी हमारी’, ‘इश्क का रंग सफेद’, अशा अनेक मालिका केल्या आहेत. तत्पूर्वी रश्मी देसाई ‘बिग बॉस’च्या १५ व्या पर्वातसुद्धा सहभागी झाली होती.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!