Latest Marathi News
Ganesh J GIF

बाॅलीवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रीविरोधात गुन्हा दाखल

अश्लील चित्रपटात काम केल्याचा आरोप, पोलीस अटकेची कारवाई करणार?, नेमकं प्रकरण काय?

चैन्नई – दक्षिणात्य अभिनेत्री श्वेता मेनन अडचणीत सापडली असून अश्लील चित्रपट आणि जाहिरातींमध्ये काम केल्याबद्दल तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. मार्टिन मेनाचेरी यांच्या तक्रारीवरून एर्नाकुलम सीजेएम कोर्टाच्या निर्देशांनंतर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

श्वेता मेननविरोधात पोलिसांनी आता गुन्हा दाखल केला आहे. श्वेताने फक्त दक्षिणात्य नव्हे, तर हिंदी चित्रपटातही काम केलं आहे. तक्रारीत श्वेता मेनन यांनी एका कंडोमच्या जाहिरातीत काम केल्याचा उल्लेखही आहे. २३ एप्रिल १९७४ रोजी जन्मलेल्या श्वेता मेनन या चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे. त्यांनी मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात केली आणि नंतर टेलिव्हिजन अँकर आणि अभिनेत्री म्हणून लोकप्रियता मिळवली. अभिनेत्रीने आर्थिक फायद्यासाठी चित्रपट आणि जाहिरातींमध्ये, ज्यामध्ये नग्नता देखील समाविष्ट आहे,त्यावरून सोशल मीडिया आणि पोर्नोग्राफिक साइट्सद्वारे सीनचा प्रचार करून पैसे कमावल्याचा आरोप पोलिसांनी एफआयआरमध्ये नोंदवला आहे. तक्रारीकर्त्याने तक्रारीत म्हटलं आहे की, श्वेताने साकारलेल्या गर्भनिरोधक कंडोमच्या जाहिराती आणि ‘रथिनिरवेदम’, ‘पलेरीमानिक्यम’ आणि ‘कालीमन्नू’ सारख्या चित्रपटांमधील सीन अश्लील असल्याचं म्हटले आहे. या प्रकरणानंतर श्वेता मेननकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. विशेष म्हणजे सध्या ती मल्याळम चित्रपट संघटनेच्या अध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या तयारीत आहे. याच दरम्यान ही तक्रार झाल्याने चर्चेला उधाण आलं आहे.

श्वेताने १९९४ साली मिस इंडिया एशिया पॅसिफिकचा किताब जिंकला होता तसेच मलयाळमसह हिंदी, तामिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी दोन केरळ राज्य पुरस्कार ‘सर्वोत्तम अभिनेत्री’ म्हणून जिंकले आहेत तसेच दोन दक्षिण फिल्मफेअर पुरस्कारही पटकावले आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!