Latest Marathi News
Ganesh J GIF

स्टिंग न दिल्यानं शेवाळेवाडी फाटा येथील चैतन्य स्वीट फोडले

पोलिस शिपाई विजयकुमार ढाकणे यांनी पाठलाग करुन आरोपींना पकडले, कुऱ्हाड कोयताची दहशत

पुणे दि २९(प्रतिनिधी) – दिनांक २८ जून २०२३, वेळ सायंकाळी साडेसहाची, ठिकाण पुणे सोलापूर रोड शेवाळवाडी फाटा, शेवाळवाडी फाटा येथे चैतन्य स्वीट आहे. या ठिकाणी संध्याकाळी साडेसहा सुमारास मोठ्या प्रमाणात रहदारी असते यात सुमारास तीन अनोळखी इसम चैतन्य स्वीट मध्ये घुसतात आणि चैतन्य स्वीट मध्ये येतात, स्टिंग मागतात स्टिंग देण्यास दुकानदार नकार करतो आणि त्यानंतर ते अनोळखी इसम कोयता आणि कुऱ्हाड काढून ऑन द स्पॉट स्वीट होम ची तोडफोड करतात. ही घटना आहे वाढलेल्या गुन्ह्यामुळे चर्चेत असलेल्या पुण्यातील.

हडपसर पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले पोलीस शिपाई विजयकुमार ढाकणे हे शेवाळेवाडी फाटा येथे कुटुंबासोबत आले असता त्याचवेळी अनोळखी इसम शेवाळवाडी चौक येथील चैतन्य स्वीट या मिठाईच्या दुकानातील सर्व काचेची कपाटे फ्रिज लोखंडी कु-हाडीने तोडफोड करुन दोघे मोटरसायकल वर पळून जात असल्याचे दिसले तसेच प्रत्यक्षदर्शी घडत असेलेली घटना पाहून पोलीस शिपाई विजयकुमार ढाकणे यांनी पळून चाललेल्या आरोपींचा पाठलाग सुरु केला, पोलीस शिपाई विजयकुमार ढाकणे यांनी पोलीस स्टेशनला माहिती कळवली त्यानंतर पोलीस स्टेशनच्या व्हाटस अँप ग्रुप वर माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक डगळे,तपास पथक अधिकारी, अंमलदार तसेच मांजरी चौकीचे अंमलदार तात्काळ घटनास्थळी पोहचले, पोलिस शिपाई विजय ढाकणे यांनी पाठलाग करुन आरोपी पळून जात असताना मोटरसायकलवरून घसरून पडले आणि उसात दोन दिशांना पळून गेले त्यानंतर पोलिस शिपाई ढाकणे यांच्या लोकेशन सर्व स्टाफ पाठवून उसात लपलेला विधी संघर्षित बालक वय 17 वर्ष व गुन्हयात वापरलेली गाडी मोटर सायकल क्रमांक MH-12-PU-6265 हिरो होंडा प्लस ही ताब्यात घेतली असून दुसरा आरोपी गौरव संतोष अडसूळ व 19 वर्ष, राहणार – कॉलनी नंबर 5, मोरे सोसायटीच्या समोर, शेवाळवाडी, हा पळून गेला असून घटनास्थळावरुन एक विधी संघर्षित बालक पळून गेला.इतर २ फरार आरोपीचा शोध सुरु आहे. योग्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे हडपसर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळ यांनी सांगितले आहे. पोलिस शिपाई विजयकुमार ढाकणे यांच्या कर्तव्यदक्षेतेमुळे आरोपींना पकडण्यात यश आले. त्यांच्या या धाडसी कामगिरी बद्दल हडपसर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी त्यांचे कौतुक करत सत्कार केला आहे.

एकीकडे पोलीस शिपाई विजयकुमार ढाकणे यांनी काही मिनिटात आरोपीला पकडले, कौतुकास्पद आहे, पण दुसरीकडे शेवाळेवाडी फाटा हा रोज संध्याकाळच्या वेळी गजबजलेला असतो मोठ्या प्रमाणात गर्दी असते, नागरिकांची येजा सुरू असते,अशातच स्वीट होम मध्ये तोडफोड सुरू होते हे थोडं भयानकच वाटतंय, आतापर्यंत कधीही या परिसरात अशी घटना घडली नाही त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, हडपसर पोलिसांनी आरोपाला पकडून चांगलं काम केले आहे पण अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!