Latest Marathi News
Ganesh J GIF

रक्षकच बनला भक्षक! सोन्याच्या दुकानात दरोडा

सुरक्षा रक्षकानेच चोरी करत लुटले एवढ्या कोटींचे सोने, या एक चुकीमुळे फुटले बिंग

उल्हासनगर दि २९(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढल्याची चर्चा होत असताना, ज्याच्यावर सुरक्षेची जबाबदारी असते त्यांनीच हात साफ केल्याचा प्रकार समोर आला आहे. उल्हासनगरमधील एका ज्वेलर्सच्या दुकानात सहा किलो सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली केल्याची घटना समोर आली आहे. पण पोलीसांनी त्याचा छडा लावत आरोपींना ओळखले आहे.

उल्हासनगरमधील विजयलक्ष्मी ज्वेलर्सच्या दुकानातून सहा किलो सोने चोरीला जाण्याची घटना घडली होती. चोरीला गेलेल्या सोन्याची किंमत तब्बल तीन कोटी २० लाख रुपये होती. पण ही चोरी दुकानाच्या सुरक्षरक्षकाने दुकान बंद असल्याचा फायदा घेत आपल्या साथीदारसह केल्याचे उघड झाले आहे. चोरीचा हा घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार उल्हासनगर कॅम्प नंबर १ येथील शिरू चौकात विजयालक्ष्मी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. आठवड्याच्या प्रत्येक मंगळवारी या परिसरातील सर्व दुकाने बंद असतात. दुकाने आणि बाजारपेठ बंद असल्याचा फायदा घेत ज्वेलर्स शॉपीच्या वॉचमनने आपल्या काही साथीदारांच्या मदतीने सोमवारी दुकान बंद झाल्यानंतर रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास दुकानात प्रवेश केला. आरोपींनी गॅस कटरचा वापर करत दुकानातील तिजोरी फोडली. आणि कोट्यावधीचे सोने लंपास केले. याची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी जात पाहणी केली होती.

पोलिसांना घटनास्थळी चार सिलेंडर आढळून आले आहेत. या गुन्ह्यातील आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. घटनेच्या तपासासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. फरार आरोपींचा पोलीस तपास करत आहेत. दरम्यान चोरट्याची ओळख पटल्याने चोरटे लवकरच जेरबंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!