Latest Marathi News
Ganesh J GIF

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटेंचा “डिजिटल मिडिया”कडून सत्कार…!

मुंबई विशेष प्रतिनिधी –  मुख्यमंत्री कार्यालयात विशेष कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती होवून राज्यातील सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे असलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख म्हणून स्वीकारल्याबद्दल डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे अध्यक्ष व ज्येष्ठ संपादक राजा माने यांनी मंगेश चिवटे यांचा सत्कार आज त्यांच्या कार्यालयात केला.यावेळी मंत्रालय कर्मचारी सहकारी बँकेचे संचालक व माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील अधीक्षक सुनील खाडे हे उपस्थित होते. गेल्या काही वर्षांत शिवसेनेच्या बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून आरोग्य सेवा क्षेत्रात गोरगरीबांसाठी मंगेश चिवटे यांनी केलेल्या सेवेचा गौरव त्यांची निवड करुन मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी केला आहे.

कोविड महामारी काळात स्वतः चार जीव धोक्यात घालून कार्य करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याच्या या भूमिपुत्राच्या कार्याचा बहुमान केल्याबद्दल राजा माने यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करुन मंगेश चिवटे यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी पत्रकार तथा जनसंपर्क अधिकारी नितीन जाधव हेही उपस्थित होते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!