Just another WordPress site

काही सेकंदातच तरुणावर 35 वार….पुण्यातील घटना..बघा धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज

Pune Crime News – पुण्याच्या नानापेठेत एका तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. अवघ्या 30 सेकंदात या तरुणावर तीक्ष्ण हत्याराने 35 वार करण्यात आले. नाना पेठेतील नाना वाडा परिसरात सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली. अक्षय वल्लाळ (वय 33) असे खून झालेल्या या तरुणाचे नाव आहे. समर्थ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक केली आहे. महेश नारायण बुरा आणि किशोर अशोक शिंदे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.. दोघेही आरोपी रेकॉर्डवरील आरोपी आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी नाना पेठ परिसरातील नवावाडा परिसरात राहतात. मयत अक्षय वल्लाळ हा त्याच परिसरात राहतो. अक्षय वल्लाळ हा नानापेठ परिसरात सामाजिक कार्यात अग्रेसर होता. समाजात त्याची चांगली ओळख होती. यामुळेच आरोपी त्याच्यावर चिडून होते.. याच कारणावरून त्यांचे यापूर्वी देखील भांडण झाले होते. दरम्यान सोमवारी मध्यरात्री अक्षय हा नानावाडा परिसरात मित्रांसोबत गप्पा मारत थांबला होता. त्यावेळी आरोपींनी बेसावध असलेल्या अक्षय याच्यावर प्राण घातक हल्ला केला. अवघ्या 30 सेकंदात आरोपींनी त्याच्यावर 35 वार केले. इतकेच नाही तर तो निश्चित पडल्यानंतर सिमेंटच्या ब्लॉकने त्याच्या डोक्यात वार केले. गंभीर जखमी झालेल्या अक्षयचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. समर्थ पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करत अवघ्या काही तासात खून करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली.

 

GIF Advt

VIDEO

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!