पुणे दि ११(प्रतिनिधी)- चिंचवड व कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकांसाठी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्टार प्रचारकांची फौज रिंगणात उतरणार आहे. दोन्ही बाजुंनी जागा जिंकण्यासाठी जोर लावण्यात येत आहे. तर राष्ट्रीय नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
स्वर्गीय आमदार मुक्ता टिळक, आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागांवर भाजपाला राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आव्हान असणार आहे. या निवडणूकीसाठी भाजपाने ४० तर राष्ट्रवादीने २० जणांची स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. भाजपाकडून निवडणूक प्रभारी मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेचे सभापती प्रवीण दरेकर, खासदार उदयनराजे भोसले, गिरीश बापट, मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार आशिष शेलार, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, आमदार विनोद तावडे, श्रीकांत भारतीय, रवींद्र चव्हाण, सुनील कर्जतकर, खासदार धनंजय महाडिक, आमदार राहुल कुल, गोपीचंद पडळकर, बाळा भेगडे, विजय देशमुख, माधुरी मिसाळ, विक्रांत पाटील, विजय चौधरी, जगदीश मुळीक, राजेश पांडे, सुधाकर भालेराव, वासुदेव काळे, इजाझ देशमुख, संदीप भंडारी, प्रकाश जावडेकर, दिलीप कांबळे, शहराध्यक्ष महेश लांडगे, हर्षवर्धन पाटील, उमा खापरे, अमर साबळे यांच्यावर प्रचाराची धुरा असणार आहे. तर राष्ट्रवादीकडुन शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनील तटकरे, माजी मंत्री एकनाथ खडसे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, धनंजय मुंडे, खासदार वंदना चव्हाण, फौजिया खान, माजी मंत्री शशिकांत शिंदे, आमदार सुनील शेळके, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण, आमदार नीलेश लंके, आमदार अमोल मिटकरी, सुभान अली शेख यांची निवड करण्यात आली आहे.
चिंचवडमध्ये शिवसेनेचे राहुल कलाटे यांनी बंडखोरी केल्याने तिरंगी लढत होत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या अडचणी वाढल्या आहेत. तर कसब्यात ब्राम्हण उमेदवार न दिल्याने भाजपाचा पारंपारिक मतदार नाराज आहे. महत्वाचे म्हणजे भाजपाकडून अमित शहा देखील निवडणूकीत उतरणार आहे.