आमदार असल्याचे सांगत पुण्यात साडेपाच लाखांचा गंडा
वानवडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल, बघा कसा घालायचे गंडा, प्रकार काय?
पुणे दि २७(प्रतिनिधी)- बनावट नोटा बनवण्याचा डेमो दाखवून सुरुवातीला त्यातून तयार केलेल्या काही नोटा देऊन खात्री पटविली जाते. त्यानंतर त्यांना तिप्पट नोटा देण्याचे आमिष दाखवून लोकांना गंडा घालणारी टोळी पुण्यात सक्रीय झाली आहे. याबाबत वानवडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशातील आमदार असल्याचं भासवून ही टोळी लोकांची फसवणूक करत होती. त्यांनी एका व्यायसायिकाला ५.५० लाखांना गंडा घातला आहे. तक्रारीनंतर. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी रुपाली राऊत, संजयकुमार पांडे, विकासकुमार रावत, समीर ऊर्फ विशाल घोगरे आणि अशोक पाटील यांना ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपाली राऊत हिने आपण मंत्री असल्याचे व संजयकुमार पांडे याने उत्तर प्रदेशात आमदार असल्याचा बनाव केला. या टोळीने भारतीय चलनातील नोटा बनवणारे केमिकल असल्याचे सांगितले. फिर्यादी यांना वानवडी येथे बोलावून घेतले. त्यांना ते कसे बनवायचे याचा डेमो दाखविला. प्रत्यक्षात त्या खर्या नोटाच ते हातचलाखी करुन आपण केमिकलच्या सहाय्याने तयार केल्याचे सांगितले. या अमिषाला बळी पडून फिर्यादी यांनी 5.34 लाख रुपये दिले, पण हा सगळा फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली. पोलिसांना आता कारवाई केली असून अधिक तपास करत आहेत. पण या प्रकारामुळे पुणे शहरात खळबळ उडाली आहे.
हुबेहुब रुपये देतो, असे सांगून त्यांना पैसे दिले नाही. तसेच त्यांनी पैसे परत मागितल्यावर त्यांना पिस्तुलने जीव ठार मारण्याची धमकी दिली. शेवटी त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक सोनवणे तपास करीत आहेत.