Latest Marathi News
Ganesh J GIF

राज्यात सत्ता असूनही शिंदे गटाच्या या महिला नेत्याला धक्का

‘या’ कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त, हलगर्जीपणा भोवला, प्रशासक नियुक्त

करमाळा दि २७(प्रतिनिधी)- करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला जोरदार झटका बसला आहे. संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतरही निवडणूक घेण्यात हलगर्जीपणा केल्याने कारखान्याचे संचालक मंडळच बरखास्त करण्यात आले आहे.कारखान्यावर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

करमाळा येथील शिवसेनेच्या नेत्या व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेल्या रश्मी बागल यांनी शिंदेच्या बंडखोरीनंतर शिंदेना साथ दिली होती. आदिनाथवर प्रशासक म्हणून प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाचे विशेष लेखापरीक्षक बाळासाहेब बेंद्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रश्मी बागल यांच्या गटास हा मोठा धक्का मानला जात आहे. मध्यंतरी बंद असलेला कारखाना सुरू करण्यासाठी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्या प्रयत्नांना यशही आले होते. मात्र, हा कारखाना राजकीय नेत्यांच्या हाती राहण्याऐवजी तो आता प्रशासकाच्या हाती गेला आहे. निवडणूक खर्च भरण्यासाठी 35 लाख रुपये भरण्यास कारखान्यास सांगण्यात आले होते. दहा लाख रुपये भरले गेले. बाकीचे राहिलेले पैसे साखर विक्री करून भरण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, अचानक कारखान्यावर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच गटातटांनी तयारी सुरु केली होती. मात्र, प्रशासक आल्याने आता निवडणुका कधी होतील हे सांगता येणे कठीण झाले आहे.

करमाळा तालुक्याचे आमदार संजय शिंदे यांनी देखील या कारखान्याची निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली होती. पण प्रशासक जरी नेमला तरी काही अडचण नाही. प्रशासकाला जे सहकार्य लागेल ते करण्याची आमची तयारी असल्याचे संजय शिंदे यांनी सांगितले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!