आयुष्याच्या वाटेवर कधी कुठलं दुःख आपल्याला गाठेल सांगता येतं नाही. जेव्हा नातेसंबंधात विश्वासघात होतो त्यापेक्षा दुसरं मोठं दुःख नाही. घर चार भिंतीने नाही तर त्यातील राहणाऱ्या माणसांमुळे असतं. त्यांच्यामधील प्रेम आणि विश्वास यावर आपण आपला एक एक क्षण जगत असतो. जीवनाचा सच्चा साथीदार मिळाला की जगणं कसं सोपं होतं. आयुष्य जगताना मग वाटेत येणारे छोटे मोठे दगडही या जीवनसाथमुळे ठोकर लागूनही काही जाणवत नाही. पण जेव्हा याच नात्यातून प्रेमाला विश्वासघात होतो ही सल आयुष्यभर भरुन निघत नाही.
सोशल मीडियावर एका व्यक्तीने त्याचा आयुष्यातील सर्वात मोठी दु:खद कहाणी सांगितली आहे. त्याला हे दु:ख त्याचा पत्नीने दिलं आहे. त्याचा बायकोचं अफेयर त्याने रंगेहात पडकलं आहे. तुम्ही म्हणाल त्यात काय आजकाल विवाह्यबाह्य संबंधाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कधी नवरा आणि तर कधी बायको या प्रेमाच्या आणि विश्वासाच्या नात्यातून कुठल्या ना कुठल्या कारणाने घराचा उबंरठा ओलांडतात. नवीन प्रेमाचं नात बनवतात आणि त्यात शारीरिक संबंध ठेवले जातात.
या माणसाला फक्त त्याच्या बायकोने नाही तर, वडिलांनीही मोठा धोका दिला आहे. वडील हे मुलांसाठी सर्वस्व असतो. अगदी त्यांच्या आयुष्यातील हिरो आणि रोलमॉडल असतात. अशात जेव्हा आपले वडीलच सुखी संसाराला ग्रहण लावतात, तेव्हा मुलांच्या आयुष्यात भूकंप येतो.
झालं असं आहे की, या मुलाला कळलं की आपल्या वडिलांचं आणि बायकोचं अफेयर सुरु आहे, त्याचा आयुष्यात वादळ आलं. द सनच्या रिपोर्टनुसार मुलाकडे त्याचे वडील राहिला आले होते. सूनेला पाहून वडिलांचे वागणं मुलाला खट्कत होते. त्याला दोघांवरही संशय येतं होता. एकेदिवशी घरामध्ये मुलांवर नजर ठेवण्यासाठी लावलेल्या कॅमेऱ्यात त्याने जे काही पाहिले तो अवाक् झाला.
खरं तर ऑफिसमध्ये असताना त्याने घरी काय सुरु आहे पाहिल्यासाठी पीसी ऑन केला. त्याची बायको वडिलांच्या बेडरुममध्ये गेली होती आणि बऱ्याच वेळ झाली ती आली नाही. त्यावरुन त्याला संशय आला आणि त्यानंतर घरी येऊन त्यांना विचारणा केली. पण बायको आणि वडिलांचं म्हणं आहे की, आम्ही टीव्हीवर शो पाहत होतो असं त्यांनी सांगितलं. तो व्यक्ती म्हणाला मला त्यांच्यावर विश्वास नाही. माझे वडील असं कसं करु शकतात. टीव्ही शो हा निव्वळ एक बहाना आहे. त्यांचं दोघांचे शारीरिक संबंध आहेत.
त्याचा वडिलांचं काही वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. त्यामुळे ते मुलासोबत राहायला आले होते. त्या व्यक्ती बायको आता दुसऱ्यांदा गर्भवती आहे. तिला जुळी मुलं झाली आहे आणि तिही त्याचा वडिलांकडून…त्या व्यक्तीने आता बायकोला सोडलं आहे. त्याला वाईट या गोष्टीचं वाटतं की, त्याच्या मुलीचे आता सावत्र बहिण भाऊ आहेत. शिवाय वडील माझ्या मुलीचे आजोबा पण आहे आणि सावत्र वडीलदेखील. हे सगळं खूप विचित्र आहे. माझ्या नात्यांवरून विश्वास उडाला आहे.
ही घटना ब्रिटेनमधील आहे. डेक्लान फुलर असं त्या व्यक्तीचे नाव आहे, तर त्याचा बायकोचे नाव स्टेफनी आहे. डेक्लानच्या वडिलांचे नाव डैरेन आहे. डेक्लानने वडिलांना म्हटलं आहे की, ”तुमच्यामध्ये थोडी जरी लाज उरली असेल तर, सहा फूट खोल जमिनीत गाडून टाक.” तर स्टेफनीचं म्हणं आहे की, ”तिने नवऱ्याचा विश्वासघात केलेला नाही.”