Latest Marathi News
Ganesh J GIF

मुख्यमंत्र्यांच्या बहिणीचा काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा

सत्ताधारी पक्षाला विरोध करत काँग्रेसला पाठिंबा, काँग्रेसला मोठे बळ, राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता

हैद्राबाद दि ३(प्रतिनिधी)- सध्या निवडणुकीचे वातावरण आहे. त्यामुळे सर्वच पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. सध्या देशातील पाच राज्यात निवडणूकीची रणधुमाळी सुरु आहे. पण तेलंगाणा राज्यातील निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. कारण वायएसआर तेलंगणा पार्टी या वर्षीची तेलंगणा विधानसभा निवडणूक लढवणार नाही. पक्षाच्या अध्यक्षा वायएस शर्मिला रेड्डी यांनी ही घोषणा केली. त्यांचा पक्ष या निवडणुकांमध्ये काँग्रेसला पाठिंबा देणार आहे.

अविभाजित आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वाय.एस. राजशेखर रेड्डी यांची कन्या शर्मिला या तेलंगाणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या विरोधक आहेत. आज त्यांनी पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली. वायएस शर्मिला म्हणाल्या की, ‘काँग्रेसला ही निवडणूक जिंकण्याची संधी आहे. सरकार बदलण्याची संधी असताना त्यात अडथळे निर्माण करणं योग्य नाही. केसीआर यांच्या भ्रष्ट राजवटीला हटवण्याच्या प्रयत्नात त्यांचा पक्ष काँग्रेसला पाठिंबा देईल’, असं त्यांनी स्पष्ट केले. सत्ताविरोधी मतांची फूट रोखण्यासाठी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याचं शर्मिला यांनी सांगितलं. विरोधी मतांची फूट झाली तर त्याचा फायदा केसीआर यांच्या नेतृत्वाखालील भारत राष्ट्र समितीला होईल, असेही त्या म्हणाल्या आहेत. काही दिवसापासून काँग्रेस आणि वायएसआर तेलंगणा पक्ष यांच्यात युतीबाबत साशंकता होती. गेल्या महिन्यात शर्मिला यांनी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचीही याप्रकरणी भेट घेतली होती. पण नंतर त्यांनी काँग्रेसचा प्रस्ताव धुडकावून लावत आता बीआरएस आणि काँग्रेसच्या विरोधात एकट्याने निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. पण आता त्यांनी आपली भूमिका बदलत काँग्रेस पक्षाला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. दरम्यान शर्मिला ह्या आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांच्या बहीण आहेत.

११९ सदस्यांच्या तेलंगणा विधानसभेसाठी ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीत बीआरएस, काँग्रेस आणि भाजप अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्यानंतर डिसेंबर २०२३ मध्ये होणारी ही तिसरी विधानसभा निवडणूक असणार आहे. पहिल्या दोन निवडणुकांमध्ये तत्कालीन तेलंगणा राष्ट्र समितीची सत्ता आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!