शिरुर लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत मंजूर कामांचा कार्यारंभ
कामाचे आदेश देण्यास सुरुवात, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश, ही कामे होणार
पुणे दि २७(प्रतिनिधी)- पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत शिरुर लोकसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांच्या ९१.५१ कोटींच्या निविदांना ग्रामविकास विभागाने आज मंजुरी दिली असून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर-हवेली तालुक्यातील कामांचे कार्यारंभ आदेश देण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता या रस्त्यांच्या कामांना लवकरच प्रत्यक्ष सूरुवात होणार आहे.
पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील कामांचा प्रस्ताव केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने मंजुरी दिल्यानंतर पुणे जिल्ह्याच्या पंतप्रधान ग्राम सडक योजना व महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास विभागाने सर्वच रस्त्यांच्या कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण केल्या. त्यानंतर या निविदा मंजुरीसाठी ग्रामविकास मंत्रालयाकडे सादर करण्यात आल्या होत्या. या निविदांना मंजुरी मिळावी यासाठी खासदार डॉ. कोल्हे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेरीस आज या निविदांना मंजुरी देण्यात आली असून कंत्राटदारांना कार्यारंभ आदेश देण्यास सुरुवात झाली आहे. पंतप्रधान ग्रामसडक योजना टप्पा ३ अंतर्गत जुन्नर तालुक्यातील ओतूर पानसरेवाडी डुंबरवाडी रस्ता ६.२ कि.मी. रक्कम रु. ३.९१ कोटी, बोरी बुद्रुक ते राजुरी उंच खडकवाडी रस्ता ७ कि.मी. रक्कम रु.४.८२ कोटी, आळे भटकळवाडी वडगाव कांदळी ते हिवरे तर्फे नारायणगाव रस्ता. ८.०४ कि.मी. रक्कम रु.५.६६ कोटी, आणि खोडद ते SH-112 रस्ता ४.०५ कि.मी. रक्कम रु. ३.१५ कोटी अशा एकूण ४ रस्त्यांसाठी २६.२७ कोटींचा निधी मंजूर केला आहे. आंबेगाव तालुक्यातील पारगाव काटापुर बुद्रुक लाखणगाव रस्ता ७.०८ कि.मी. रक्कम रु.८.३७ कोटी, प्रजिमा १४ वैदवाडी ते इजिमा ३० रस्ता ५.०४ कि.मी. रक्कम रु. ५.८० कोटी आणि प्रजिमा ५ कानसे गंगापूर बुद्रुक खुर्द ठाकरवाडी पारुंडे रस्ता. ८.०१ कि.मी. रक्कम रु. ६.४५ कोटी अशा तीन रस्त्यांसाठी रु. २०.६२ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. खेड तालुक्यातील काळुस ते संगमवाडी. ४.५५ कि.मी. रु. ३.२९ कोटी, प्रजिमा १९ खरपुडी बुद्रुक ते रेटवडी वाकळवाडी वरूडे. ४.०४ कि.मी. रक्कम रु. ३.५४ कोटी आणि प्रजिमा १६ हेद्रुज बच्चेवाडी कडलगवाडी वाशेरे कोहींडे बुद्रुक रस्ता. ९.१५ कि.मी. रक्कम रु. ७.९३ कोटी अशा ३ रस्त्यांसाठी १४.७६ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात एकूण ६ रस्त्यांची कामे मंजूर झाली असून त्यानुसार शिरूर तालुक्यातील प्रजिमा ९ अहमदाबाद ते दुडेवाडी ते निमगाव दुडे ते प्रजिमा ५१. ६.४ कि.मी. रक्कम रु. ४.७८ कोटी, प्रजिमा ५३ कोळगाव डोळस ते प्रजिमा १०० मांडवगण फराटा ते पिंपळसुटी. ९.५७ कि.मी. रक्कम रु.१२.४९ कोटी आणि राज्यमार्ग ११८ न्हावरा ते निर्वी धुमाळवस्ती ते कोळपेवस्ती. ५.१० कि.मी. रक्कम रु. ६.२२ कोटी आणि हवेली तालुक्यातील प्रजिमा २९ डोंगरगाव ते वाडेबोल्हाई गोतेमळा भिवरी ते कोरेगाव मूळ रस्ता. ४.०६ कि.मी. रक्कम २.२६ कोटी, रा.मा. ९ सोरतापवाडी तरडे खालचे ते तरडे वरचे तरडे रस्ता. ५.०४ कि.मी. रक्कम ४.६३ कोटी आणि राज्यमार्ग ११६ केसनंद ते वाडेगाव गोतेमळा आष्टापूर हिंगणगाव रस्ता, ७.१३ कि.मी. रक्कम ६.११ कोटी या एकूण ३६.४९ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या संदर्भात खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत कामांच्या मंजुरीसाठी मुळातच बराच काळ लागला होता. त्यामुळे मंजुरी मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन लवकर कामे सुरू होतील अशी अपेक्षा होती. परंतु ग्रामविकास विभागाकडून या निविदांना मंजुरी मिळण्यास दिरंगाई होत होती. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. अखेरीस ही मंजुरी मिळून कार्यारंभ आदेश देण्यास सुरुवात झाली असल्याने आता लवकर ही कामे सुरू होतील. सर्वच तालुक्यातील रस्ते अतिशय महत्त्वाचे असल्याने ते चांगल्या दर्जाचे व्हावेत यासाठी आपण बारकाईने लक्ष ठेवणार असल्याचे खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले आहे.