Latest Marathi News
Ganesh J GIF

सरकारमधील हे मंत्री आमच्या मतदारसंघातील काम करत नाहीत

सरकारमधील इतक्या आमदारांचे मुख्यमंत्र्यांना नाराजीचे पत्र, मोठे आरोप, सरकार पडणार?

बेंगलोर दि २७(प्रतिनिधी)- राजकारण आणि अस्थिरता हा आजकाल परवलीचा शब्द बनला आहे. आमदार एका रात्रीत पक्ष बदलत असल्याने सरकार देखील राहिल की पडेल असा प्रश्न उभा राहत आहे. कारण कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन होऊन अवघे दोने महिने झाले आहेत. मात्र अशातच राज्यातील ११ आमदार सिद्धरामय्या सरकारवर नाराज असल्याचे जाहीर झाल्याने खळबळ उडाली आहे. काँग्रेसच्या ११ आमदारांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहून त्यांना कामात येणाऱ्या समस्यांची माहिती दिली आहे. त्यामुळे सरकार अस्थिर होण्याची शक्यता आहे.

काँग्रेसच्या ११ आमदारांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहून कामात येणाऱ्या अडचणींची माहिती दिली आहे. हे पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं असून ते बीआर पाटील यांच्या लेटरहेडवर लिहिले आहे. गुलबर्गा जिल्ह्यातील काँग्रेस आमदार बी.आर. पाटील आणि इतर १० जणांनी पत्रात म्हंटलं की, आम्ही लोकांच्या विश्वासानुसार काम करू शकत नाही. २० हून अधिक मंत्री आमच्या मतदारसंघातील कामाबद्दल प्रतिसाद देत नाहीत’. मंत्र्यांपर्यंत पोहोचणं मुश्कील होत आहे. त्यांना कामाची माहिती देण्यासाठी त्रयस्थ व्यक्तीशी संपर्क साधावा लागतो. त्यामुळे लोकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण होत नाहीत. स्थानिक आमदार असतानाही आम्हाला आमच्या कामासाठी तिसऱ्या व्यक्तीकडे जावं लागत असल्यानं आम्ही निराश आहोत, अधिकार्‍यांच्या बदल्यांसाठी आमच्या शिफारस पत्रांचा विचार केला जात नाही. कोणीही अधिकारी आमचं ऐकत नाही’, असा तक्रारीचा सूर या पत्रात आहे. त्यामुळे कर्नाटकमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पण काही आमदारांनी मात्र आम्ही पत्र पाठवले आहे,पण ते हे पत्र नाही असा दावा केला आहे. तसेच उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनीही डीके शिवकुमार यांनीही प्रत्येकजण आपापली कामे करत आहे. पत्रात जे लिहिलं, तसं काहीही नाही. या फक्त अफवा पसरवल्या आहेत. असे स्पष्ट केले आहे. तसेच राज्य काँग्रेसमध्ये असंतोष असल्याच्या बातम्या आणि अफवांचे खंडन केले आहे.

दोन दिवसांपूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी भाजपवर ऑपरेशन लोटसची सुरुवात केल्याचा आरोप केला होता. माझ्याकडे अशा लोकांची माहिती आहे जे सिंगापूरला फक्त कर्नाटकातील काँग्रेस सरकार अस्थिर करण्याचा प्लॅन रचण्यासाठी गेले आहेत, असा दावा केला होता. पण या पत्रामुळे मात्र खळबळ उडाली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!