Latest Marathi News

प्रेमविवाह केलेल्या विवाहितेची गळफास घेत आत्महत्या

लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यात घेतला टोकाचा निर्णय, सासरी छळाचा आरोप, काजलसोबत काय घडले?

जळगाव दि १३(प्रतिनिधी)-जळगाव एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीतील विवाहित महिलेने राहत्या घरात गळफास घेतला. ही घटना रामेश्वर कॉलनीत घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. काजल गणेश राठोड असे मृत विवाहितेचे नाव आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड तांडा येथील रहिवाशी राहुल चव्हाण याचा प्रेमविवाह लिहा तांडा ता. जामनेर येथील काजल राठोड हिच्याशी तीन महिन्यांपूर्वी झाला होता. लग्नानंतर काही दिवस चांगली वागणूक मिळाल्यानंतर काजलला आजतसासु सुग्राबाई चव्हाण, सासु मुक्ताबाई चव्हाण, चुलत सासु पार्वतीबाई चव्हाण ह्या किरकोळ कारणावरून टोचुन बोलत असत. तसेच तीचा छळ करत त्यामुळे नेहमी त्यांच्यात वाद सुरू होते. सतत होणाऱ्या भांडणामुळे राहुल चव्हाण हा १० जुलै रोजी काजल सोबत पाचोरा येथील गोविंद नगर भागात भाड्याची खोली घेऊन राहायला आला होता. दरम्यान १३ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास काजल हिने टोकाचे पाऊल उचलत घराच्या मागच्या बाजूला असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करत आपली जीवन यात्रा संपवली. हा प्रकार कुटुंबियाला समजल्यानंतर त्यांनी तातडीने काजल यांना खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.राहुल सोनवणे यांनी मयत घोषीत केले.

ग्रामीण रुग्णालयात काजल हिच्या आईसह माहेरच्या मंडळींनी एकच आक्रोश करत सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून काजल हिने आत्महत्या केल्याचा आरोप केला. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास कॉन्स्टेबल स्वप्नील पाटील करीत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!