Latest Marathi News
Ganesh J GIF

भाजपाच्या ‘या’ आमदार अडकल्या लिफ्टमध्ये

संकटमोचकांनी केली सुटका, सुटकेनंतर आमदारांचा जीव भांड्यात,नक्की काय घडले?

मुंबई दि १३(प्रतिनिधी)- भाजपाची कार्यशाळा भिवंडीतील साया ग्रँड क्लब येथे पार पडली कार्यशाळेला भाजपचे सर्व आमदार-खासदार उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी मार्गदर्शन करताना भाजपाला विजयी करण्यासाठी काम करण्याचे आदेश दिले. तसेच महाविकास आघाडीवर जोरदार टिका केली. पण या कार्यक्रमाआधी कार्यशाळेला आलेले ३ आमदार लिफ्टमध्ये अडकले होते. पण अखेर त्यांची सुटका करण्यात आली.

भिवंडीतील एका रिसॉर्टमध्ये ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्या ठिकाणी जात असताना लिफ्टमध्ये आमदार प्रवीण दरेकर, मंदा म्हात्रे आणि श्वेता महाले हे लिफ्टमध्ये अडकले. यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन त्यांच्या मदतीला धावले आणि त्यांनी या तीन आमदारांची लिफ्टमधून सुटका केली. आमदार मंदा म्हात्रे यांना लिफ्टमध्ये बराच वेळ अडकल्याने अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्यावेळी प्रविण दरेकर यांनी त्यांना आधार दिला. महाजन यांनी लिफ्टचा दरवाजा वाकवत दरेकर, म्हात्रे आणि महाले यांना बाहेर काढले, त्यामुळे या तीनही आमदारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. संकटमोचन अशी ओळख असलेले महाजन पुन्हा एकदा भाजपाच्या आमदारांसाठी धावल्याचे दिसले. भाजपने महाराष्ट्रात २०२४ साली होऊ घातलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी महाविजय २०२४ हे अभियान हाती घेतले आहे. या अभियानांतर्गत पक्षाच्या सर्व आमदार व खासदारांचा प्रशिक्षण दिले जाणार आहे.

भाजपने राज्यात विधानसभेसाठी १५२ प्लस तर लोकसभेला ३५० जागा जिंकण्याचे उद्दिष्ठ ठेवले आहे. त्यासाठी महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्याचे ठरविण्यात आले आहे. तसेच “मोठं कुटुंब, सुखी कुटुंब”चा नारा देण्यात आला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!