राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बैठकीत शेतकऱ्यांचा गोंधळ
शेतकऱ्यांचा जोरदार गोंधळ, राजीनाम्याची मागणी, बघा काय घडल
सोलापूर दि ४ (प्रतिनिधी)- सध्या कांद्याला मिळणाऱ्या कमी भावामुळे शेतकऱ्यांमध्ये सरकार विरोधात असंतोष आहे. शेतकरी संतप्त झाले असून त्यांच्या रोषाचा सामना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना करावा लागला आहे.
सोलापूरचे पालकमंत्री असलेले राधाकृष्ण विखे पाटील नियोजन भवन येथे बैठक घेत होते. या बैठकीत शेतकऱ्यांनी गोंधळ घातला. कांद्याला भाव नसल्यामुळे भैया देशमुख यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गाडीवर कांद्याने आंघोळ घालण्याचा इशारा दिला होता. त्याचे निवदेन देण्यासाठी ते आले होते. परंतु, विखे-पाटील हे निवेदन न स्वीकारताच निघून गेले. विखे-पाटील यांच्या या भूमिकेमुळे नियोजन भवनात कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ घातला. यावेळी विखे पाटील यांच्याविरोधात घोषणाबाजी करत पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही शेतक-यांनी केली. यावेळी पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये वाद झाला. या वादाचा व्हिडीओही सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. दरम्यान पोलिसांनी भैय्या देशमुख यांना ताब्यात घेतले आहे.
मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेत नाफेडला कांदा खरेदीच्या सूचना केलेल्या होत्या. सोलापूरमध्ये जर नाफेडतर्फे खरेदी होत नसेल तर चौकशी करण्यात येईल. लगेचच कार्यवाही केली जाईल. अनुदान संदर्भात निर्णय अजून व्हायचा आहे.अशी माहिती देत विखे यांनी शेतक-यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला