
गाैतमी पाटीलच्या कार्यक्रमात दोन गटात हाणामारी
गाैतमीच्या कार्यक्रमात पुन्हा राडा, हाणामारीचा व्हिडिओ तुफान व्हायरल
पुणे दि ५(प्रतिनिधी)- गाैतमी पाटील आणि वाद हे समीकरण अलीकडे ठरलेले आहे. कारण गाैतमी पाटीलच्या खेडच्या कार्यक्रमात जोरदार धुडगूस घातलेला पहायला मिळाला. पुण्याच्या खेड तालुक्यात हा प्रकार घडला. हा सगळा राडा थांबवण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
खेड तालुक्यातील गुंडाळवाडी येथे वेताळेश्वर महाराजांच्या यात्रा उत्सवनिमित्ताने गाैतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गाैतमी पाटीलच्या कार्यक्रमात तरुणाईचा उत्साह बेभान असतो. तसा यो याही कार्यक्रमात पहायला मिळाला. तरुणांनीही एकमेकांच्या खांद्यावर बसून डान्स करत चांगलाच धुडगूस घातला. यावेळी कार्यक्रम बंद करताच पुन्हा एकदा वन्समोर म्हणत गाणे लावण्यावरुन स्टेज समोरच तरूण एकमेकांसमोर भिडले. त्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करत हा वाद शांत करावा लागला. मात्र गाैतमीचा कार्यक्रमही अर्ध्यावरच बंद करण्याची पाळी आयोजकांवर आली. दरम्यान या वादाचा व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
गाैतमीचा कार्यक्रमाला विरोध होत असला तरीही तिच्या कोणत्याही कार्यक्रमाला प्रचंड गर्दी पहायला मिळते. याआधीही गाैतमीच्या कार्यक्रमात जोरदार राडे पहायला मिळाले आहेत. अनेकदा तर प्रचंड गर्दीमुळे पोलीसांनी गाैतमीला स्वतः गाडीतून बाहेर काढण्याची वेळ आली आहे. त्यामुळे गाैतमीचा हा फिव्हर सध्या तरुणाला भुरळ घालत असल्याचे दिसत आहे.