Latest Marathi News
Ganesh J GIF

काँग्रेसने भाकरी फिरवली, अध्यक्षपदावरुन यांना हटवले

अंतर्गत गटबाजीमुळे अध्यक्षपदी नवीन चेहरा, आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- आगामी निवडणुका लक्षात घेत काँग्रेस पक्षसंघटनेत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाई जगताप यांची उचलबांगडी करण्यात आली असून त्यांच्या जागी वर्षा गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे.

काँग्रेसने मुंबईसोबतच गुजरात आणि पाँडेचेरीमध्येही नव्या प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती केली आहे. वर्षा गायकवाड या मुंबईतील धारावी मतदारसंघातून सलग ४ वेळा विधानसभेवर निवडून गेल्या आहेत. तसेच त्यांनी २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर शालेय शिक्षण मंत्री म्हणून काम पाहिले होते. त्याआधी त्यांनी मविआ सरकारच्या काळात महिला आणि बालविकास मंत्री म्हणून काम पाहिले होते. वर्षा गायकवाड या काँग्रेसचे दिवंगत नेते एकनाथ गायकवाड यांच्या कन्या आहेत. ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने हा निर्णय घेतला असून, अधिकृतपणे पत्र काढले आहे. गायकवाड या सर्वसमावेशक, सर्वांना सोबत घेऊन जाणारे नेतृत्व आहेत. तसेच दलित आणि मुस्लिम मतदारामध्ये प्रभाव आहे. गायकवाड यांचा मुंबईत चांगला जनसंपर्क आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक, लोकसभा, विधानसभेसाठी वर्षा गायकवाड यांची मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती महत्त्वाची आहे. दरम्यान गुजरातच्या प्रदेशाध्यक्षपदी खासदार शक्तीसिंह गोहील यांची तर पुद्दुचेरीच्या प्रदेशाध्यक्षपदी खासदार वैथिलिंगम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मागील काही दिवसापासून काँग्रेसमध्ये फेरबदल होण्याचे संकेत मिळत होते. नाना पटोले यांची उचलबांगडी होईल अशी चर्चा असताना भाई जगताप यांची हकालपट्टी करत काँग्रेसने सर्वांना चकित केले आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात अनेकांची नाराजी आहे. त्यामुळे पटोले यांचे पद ही धोक्यात आलेले आहे.

भाई जगताप हे मुंबई काँग्रेस अध्यक्ष असताना पक्ष वाढीसाठी विशेष योगदान राहिले नाही. त्यांच्या विरोधात तक्रारी होत्या. त्यामुळे आमदार वर्षा गायकवाड यांना संधी मिळाली. अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मुंबई महापालिकेत काँग्रेसचे ३० नगरसेवक होते. ती संख्या वाढवण्याचे आव्हान वर्षा गायकवाड यांच्यासमोर आहे. दरम्यान वर्षा गायकवाड या काँग्रेसच्या पहिल्या महिला मुंबई अध्यक्षा ठरल्या आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!