
जमिनीच्या वादातून भर रस्त्यात केला कोयत्याने हल्ला
हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद, दोन गटाचा वाद रक्तरंजित वळणार, कारण काय?
छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगरमधील बिडकीन परिसरात दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याछत्रपती संभाजीनगरची घटना समोर आली आहे. एका गटाने दुसऱ्या गटावर तलवार, कोयता आणि लोखंडी रॉडने हल्ला केला. याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
पुण्यापाठोपाठ आणि कोयता गँगचे लोन महाराष्ट्रात सगळीकडे पसरले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्येही कोयता नाचवत धुडगूस घातल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार बीडकीन येथील सोमपुरी गावातील जागेच्या वादातून दोन गटात मागील काही दिवसापासून वाद आहे. काल या वादाचे हाणामारीत रुपांतर झाले. व्हिडीओत दिसत आहे की, कल्याणनगर रस्त्यावर दबा धरून बसले होते. यावेळी घटनास्थळी दोन तरुण दुचाकीवरून दाखल झाले. तेव्हा दबा धरून बसलेल्या गटाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. तलवार, कोयते आणि लोखंडी रॉडने मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी यावेळी दुचाकीवरील तरुणांनी तातडीने दुचाकी घटनास्थळी टाकून पळ काढला आणि त्यांनी दुकानातून लोखंडी रॉड आणि लाकडी दांडा घेत प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी एका तरूणाने कोयत्याने वार केला, पण समोरच्या तरूणाने तो चुकवल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या घटनेत तीन जण जखमी झाले आहेत.
ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अद्याप दोन्ही गटाच्या वतीने गुन्हा दाखल झाला नसल्याची पोलिसांची माहिती. पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.