Latest Marathi News
Ganesh J GIF

क्रिकेट चाहत्याने या प्रसिद्ध अभिनेत्री यासाठी दिली धमकी

व्हिडिओ शेअर करत अभिनेत्रीने दिली माहिती, पोस्ट करत भडकलेली अभिनेत्री म्हणाली माझ्यासाठी...

मुंबई दि १३(प्रतिनिधी)- सध्या आयपीएलचा हंगाम उत्साहवर्धक स्थितीत येऊन पोहोचला आहे. कोणता संघ सेमी फायनलमध्ये जाईल हे आत्ताच सांगणे कठीण आहे. पण त्यामुळे चाहते मात्र कमालीचे आक्रमक असतात सध्या सोशल मिडीयावर एक व्हिडीओ व्हायरल झाला असुन त्यात एका चाहत्याने थेट एका अभिनेत्रीला धमकी दिली आहे.


टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत आणि बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला यांच्यातील नात्यावर सोशल मिडीयावर जोरदार चर्चा होत असते. उर्वशीसोबत असणाऱ्या अफवांमध्ये तथ्य नसल्याचे ऋषभने स्पष्ट केले असले, तरी उर्वशीच्या बाजूने असे कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. पण यांचे चाहते मात्र चांगलेच आक्रमक असतात. असाच एक व्हिडिओ गेल्या काही दिवसांत इंटरनेटवर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक क्रिकेट चाहता अक्षर पटेलला आयपीएल सामन्यादरम्यान म्हणतो, “अक्षर भाऊ ऋषभला म्हणा की आम्ही तुझ्या सोबत आहे उर्वशी रौटोलाला सोडणार नाही.” अक्षरनेही त्या चाहत्याकडे पाहिलं आणि स्मितहास्य केलं. आता हा व्हिडिओ उर्वशी रौतेलापर्यंत पोहोचला असून तिने यावर नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, तिच्या नाराजीचे कारण त्याचे नाव ऋषभसोबत जोडणे नसून दुसरेच आहे. चाहत्याने त्याने उर्वशीचे आडनाव चुकीचे उच्चारले जे अभिनेत्री उर्वशीला अजिबात आवडले नाही. व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना उर्वशीने तिच्या इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला. व्हिडिओतील व्यक्ती आपले आडनाव चुकीचे घेत असल्याबद्दल आक्षेप नोंदवला आहे. तिने एक पोस्ट लिहिली आहे त्यात तिने लिहिले की, माझ्या आडनावाला काहीही म्हणणे सोडून द्या. ते माझ्यासाठी मौल्यवान नाव आहे. रौतेला या शब्दाला अर्थ, सामर्थ्य आणि आशीर्वाद आहे. उर्वशीने शेअर केलेल्या व्हिडिओमधून ऋषभ पंतचे नाव कट करण्यात आले आहे. उर्वशी रौतेलाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट केलेल्या व्हिडिओवर लोकांच्या मजेदार कमेंट्सही येत आहेत. क्रिकेटर ऋषभ पंत मैदानापासून दूर आहे. ३१ डिसेंबर २०२२ रोजी दिल्लीहून रुरकीला जात असताना त्यांचा अपघात झाला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता.

ऋषभ आणि उर्वशीची नावे पहिल्यांदा २०१८ मध्ये एकत्र जोडली गेली होती. त्यावेळी दोघे एकत्र एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसल्याच्या बातम्या आल्या होत्या. गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या अखिलच्या चित्रपटात उर्वशीने वाइल्ड साला हा आयटम डान्स नंबर केला होता. दाक्षिणात्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये उर्वशी रौतेला खूप लोकप्रिय असून दिग्गज अभिनेत्यांसोबत तिने काम केले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!