Latest Marathi News
Ganesh J GIF

भाजप नेत्याचं टीकास्त्र ; शरद पवारांनी बॉम्ब स्फोटातील आरोपी विमानातून आणलं होतं

शरद पवार हे भ्रष्टाचाराचे सरदार आहेत, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यात बोलताना केली. अमित शाह यांच्या विधानाची जोरदार चर्चा झाली. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलताना शरद पवारांनी या टीकेला प्रत्युत्तर दिलं.ज्या माणसाला सर्वोच्च न्यायालयाने तडीपार केलं आहे. त्याच्या हातात देशाचं गृहमंत्रीपद आहे, असं शरद पवार म्हणाले. यावरून राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. शरद पवार वैफायल्यातून टीका करत आहेत. शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. तरी अशी टीका करतात. शरद पवारांनी बॉम्ब स्फोटातील आरोपी विमानातून आणलं होतं. मग यावर आम्ही टीका करायची का? यापूर्वी कधी असं झालं नाही, असं विखे पाटील म्हणाले.

उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ते आमचे जुने मित्र आहे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा… अनेकांचे मुख्यमंत्री होऊ लागले आहे. राज्याची जनता ठरवेल. लोकसभेला वेगळी परिस्थिती होती. कापण आता राज्यात परिस्थिती वेगळी आहे. राज्यात महायुतीचं सरकार येईल, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.कांद्याबाबत दोन मतप्रवाह आहेत. निर्यात मूल्य कमी झाले पाहिजे असा एक वर्ग आहे. कांदा व्यापार्यांनी शेतकाऱ्यांना वेठीस धरलं आहे. 5 लाख कांदा निर्यात करायचा आहे. पण तो मिळत नाही. शेतकऱ्यांच्या कडे कितीतरी कांदा उपलब्ध आहे. निर्यात मूल्य कमी झाले पाहिजे अधिक कांदा निर्यात झाला पाहिजे. पियुष गोयल यांना विनंती केली आहे, असं विखे पाटील म्हणाले.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!