Latest Marathi News
Ganesh J GIF

‘दादा’ म्हणत होते पोलिसांची ती मोक्याची जमीन बिल्डरला द्या

माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकरमुळे अजित पवार अडचणीत, आरोपामुळे खळबळ, अजित दादा म्हणाले....

पुणे दि १५(प्रतिनिधी)- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सत्तेत सहभागी होत पुन्हा एकदा पुण्याचे पालकमंत्री झाले आहेत. पण आता पुन्हा एकदा पालकमंत्री पदाची माळ पडल्यानंतर त्यांनी बैठकींचा धडाका उडवून दिला आहे. पण आता अजित पवार यांच्यावर एक मोठा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. माजी पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकात हे आरोप केलेले आहेत. अर्थात त्यात त्यांनी कोठेही अजित पवार असा उल्लेख केलेला नाही.

मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या पुस्तकात केलेल्या एका गौप्यस्फोटाने राज्याच्या राजकारणात आता खळबळ उडाली आहे. मीरा बोरवणकर यांनी दादा म्हणत हे आरोप केले आहेत. त्या पुण्याच्या पोलीस आयुक्त असताना येरवडा परिसरातील पोलिस दलाची जागा एका खासगी विकसकाला देण्याबाबतचा विषय होता. त्याला तत्कालीन आयुक्त बोरवणकर यांनी नकार दिला होता. मीरा बोरवणकर यांनी पुस्तकात म्हटले आहे की, पुण्याचे पोलिस आयुक्त झाल्यानंतर मी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना भेटत होते. तसेच, आसपासच्या पोलिस ठाण्यांतील गुन्ह्यांचा आढावा घेतला होता. पुण्याच्या विभागीय आयुक्तांचा मला एके दिवशी फोन आला आणि त्यांनी सांगितले की, पुण्याचे पालकमंत्री तुमच्याबद्दल विचारत आहेत. तुम्ही त्यांना एकदा भेटावं. विभागीय कार्यालयातच मी पालकमंत्र्यांची भेट घेतली. पालकमंत्र्यांकडे येरवडा पोलीस स्टेशन परिसराचा नकाशा होता. त्यांनी मला सांगितलं की, या जागेचा लिलाव झालेला आहे. जास्त बोली लावणाऱ्यासोबत मी जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पार पाडावी. मी पालकमंत्र्यांना सांगितलं की, येरवडा पुण्यातील मध्यवर्ती ठिकाणी आहे. त्यामुळे भविष्यात मोक्याच्या ठिकाणी जागा पुन्हा मिळणार नाही. शिवाय कार्यालयं आणि पोलीस वसाहतीसाठी आपल्याला या जागेची गरज असल्याचं मी त्यांना सांगितलं. मी आताच आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारलेला असताना सरकारी जमीन खासगी व्यक्तीला दिल्यास माझ्याकडे चुकीच्या नजरेनं बघितलं जाईल. पण, त्या मंत्र्याने माझं काहीही ऐकलं नाही आणि जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याचा आग्रह धरला. माझं म्हणणं ऐकल्यानंतर त्या मंत्र्याने हातातील नकाशा टेबलवर भिरकावला. त्याचवेळी त्यांनी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याविषयी अनेक अपशब्द वापरले. मी मात्र त्यांना सॅल्यूट करून निघून गेले. पण त्यानंतर एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मला सांगितले की दादांना नाही म्हणायची कोणाची हिम्मत नाही. अर्थात दादा हा शब्द कंसात लिहिला आहे. विशेष म्हणजे यावेळी मीरा बोरवणकर यांनी आर. आर. पाटील यांचे काैतुक केले आहे.पण त्यांच्यावर दबाव टाकला जात होता असा आरोप त्यांनी केला आहे. त्यात दादा असा उल्लेख असल्यामुळे ते नेते अजित पवारच असल्याची चर्चा सुरु आहे.

दरम्यान अजित पवार यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. लिलावाच्या निर्णयाला आपण त्यावेळी विरोध केल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे विरोधक मात्र आक्रमक झाले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार आणि राज्य सरकारवर टीका केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!