Latest Marathi News
Ganesh J GIF

या अभिनेत्रीची बदनामी करणे या युट्युबरला पडले महागात

अभिनेत्रीच्या पतीने युट्युबरला पाठवली कायदेशीर नोटीस, नक्की काय घडले, म्हणाली बदनामी होत असेल तर...

मुंबई दि १४(प्रतिनिधी)- बाॅलीवूड मधील अभिनेते आणि अभिनेत्रीला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. अनेकदा स्टार्स त्याकडे दुर्लक्ष करतात. पण अनेकदा काही स्टार्स ट्रोलिंगला फारच मनावर घेतात. असाच काहीसा प्रकार बाॅलीवूडमध्ये घडला आहे. याप्रकरणी आता कायदेशीर लढाई सुरु झाली आहे.

बाॅलीवूड अभिनेत्री सोनम कपूर सध्या चांगलीच चर्चेत आहे. एका युट्यूबरने एका व्हिडीओमध्ये सोनमला मुर्ख म्हणत हिणवले होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडीओनंतर सोनम कपूर आणि तिचा पती आनंद अहूजाने संबंधित युट्यूबरला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. रागिनी नावाच्या युट्युबरने सोनम कपूरचा एका व्हिडिओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये तिने सोनम कपूरचा मुर्ख असा उल्लेख केला होता. एवढच नाही तर तिने सोनमला सोशल मीडियावर रोस्ट देखील केले होते. पण बहुतेक सोनमला हा व्हिडिओ आवडला नव्हता. त्यामुळे सोनमने आता तिला नोटीस पाठवली आहे. कारण युट्युबर राखीने एक स्क्रीनशाॅट शेअर केला आहे. त्यात ती म्हणत आहे की, ‘सोनम कपूर हिच्यावर मी जो व्हिडीओ तयार केला आहे, तो व्हिडीओ मी डिलिट करावा अशी तिची इच्छा आहे. पण व्हिडीओमध्ये मी सोनम हिच्याबद्दल काहीही वाईट बोलली नाही…’ तर दुसरा स्क्रिनशाॅट शेअर करत तिला सोनमचा पती आनंद अहूजाने पाठवलेली नोटीस दाखवली आहे. दरम्यान युट्यूबरने सोनम आणि तिच्या कंपनीच्या ब्रँडची प्रतिष्ठा खराब करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप आनंद अहुजाने केला आहे. आता या प्रकरणी पुढे काय होणार हे पहावे लागेल. दरम्यान मध्यंतरी अनिल कपूर यांनी देखील आपल्या परवानगी शिवाय कुणी त्यांचा फोटो, आवाज, आणि व्हिडिओ याचा वापर करत असेल तर त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला होता.

सोनमच्या प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास तिनं शोम मखिजा यांच्या ब्लाईंड नावाच्या चित्रपटामध्ये दमदार अभिनय केला होता. अभिनेत्री सध्या चित्रपटापासून दुर असते ती आपला पती आनंद अहुजा आणि मुलगा वायूसोबत वेळ घालवत असते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!