Latest Marathi News
Ganesh J GIF

शिरूरमध्ये दादाचा वादा हटके… अजित पवारांचा विश्वास जिंकणार – माऊली कटके

न्हावरे (ता. शिरूर),( प्रतिनिधी- चंदकांत दुडे ) – न्हावरे (ता. शिरूर)शिरूर विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या सभेने वातावरण तापवले असून लाडकी बहीण योजनेपासून विविध सरकारी योजना, रोजगार यासह विविध विकासाच्या मुद्द्यांसह चासकमान , घोडगंगा कालव्याचे पाणी,शेतकऱ्यांना दिवस वीज, घोडगंगा कारखाना सुरू करण्यासह, ऋषिराज यांच्या अपहरण प्रकरणावर टाकलेला प्रकाश, अमोल कोल्हेंचा घेतलेला समाचार यासह अशोक पवार यांचा अरे बेटा म्हणून केलेल्या उल्लेखासह या विधानसभेत व्यंकटेश कृपा होणार असून रात्र वैऱ्याची असून जागे रहा अशा विविध आक्रमकता, विकासाच्या मुद्द्यांवर ठाम विश्वास देत शिरूर येथील सभेत दादांचा वादा हटके असून विश्वास जिंकणार माऊली कटके असा विश्वास अजित अपवरांनी न्हावरा येथील सभेत विश्वास दिला. महायुतीचे व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शिरूर विधानसभेचे उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या प्रचारासाठी न्हावरे (ता.शिरूर) येथील सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.या सभेत त्यांनी अजित पवार यांनी विरोधकांवर तीव्र टीका करत, माऊली कटके यांच्या विजयासाठी नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन करत माऊली कटके यांना चांगला प्रतिसाद मिळत असून त्यांचा विजयी तुम्ही करणार असून तेवीस तारखेला विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला..

“अरे अशोक बेटा…” – अशोक पवारांवर थेट हल्ला!
अजित पवार यांनी विरोधक ॲड. अशोक पवार यांच्यावर थेट हल्लाबोल करत म्हटले, “अशोक बेटा, माझी का बदनामी करतोस?” भावकी उण्याची वाटेकरी असते. माझी का बदनामी करतो, मी काय त्याच घोड मारलं.. बांध रेटला..मी म्हणेल ते खर.. अनेक कंगोरे आहेत तो कारखाना बंद पडला…मला कारखाना बंद पडायचा असता तर व्यंकटेश बंद पडला असता मी मदत करणारा कार्यकर्ता आहे असा उल्लेख केला.

अजित पवारांनी स्थानिक रोजगार, लाडकी बहिण योजना, कालव्याचे पाणी, चासकमानचे काम, आणि शेतकऱ्यांसाठी दिवसा वीजपुरवठा यांसारख्या मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण घोषणा केल्या.

लवकरच घोडगंगा कारखाना सुरू करणार –
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी “घोडगंगा साखर कारखाना बंद पडला तो आर्थिक गैरव्यवस्थेमुळे. मी मदत करणारा कार्यकर्ता आहे, बदनामी करणारा नाही.” कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी त्यांनी एससीडीसी कर्जाचे काम मार्गी लावण्याची जबाबदारी स्वीकारली. असून लवकरच घोडगंगा कारखाना सुरू करणार असून यावर्षी कोणाचेही उसाचे कांडे शिल्लक राहणार शेजारील सर्व कारखान्यांना ऊस नेण्याची विनंती प्रसंगी त्यात राज्यशासनाची मदत करण्याचे आश्वासन अजित पवारांनी देताच उपस्थितांनी शिट्या व टाळ्या वाजवत प्रतिसाद दिला.

विकास, शेतकरी, रोजगार यांच्यावर आश्वासन –
स्थानिक युवकांसाठी ८०% रोजगार सुनिश्चित करण्याचा पवारांचा निर्धार स्पष्ट होता.

कालव्यांचे पाणी व दुरुस्ती –
– चासकमान व घोडगंगा कालव्याच्या दुरुस्तीचे काम आणि टेल पर्यंत पाणी पोचवण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

माऊली कटके यांच्या विजयाचा संकल्प:
अजित पवारांनी कटके यांना विधानसभेत पाठवण्यासाठी नागरिकांना भावनिक आवाहन केले. “२३ तारखेला माऊली आमदार होईलच,” असे ते म्हणाले. यावर उपस्थित जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

अजित पवारांचा कोल्हेंना चष्मा बदलण्याचा टोला –
अमोल कोल्हे यांच्या वक्तव्याचा समाचार घेत “गुलाबी जॅकेटवरून वाद घालणाऱ्यांनी चष्मा बदलावा. ही निवडणूक विकासासाठी आहे, मी त्या रंगाचे जॅकेट घालत नाही. यावेळी कोल्हेंच्या निष्ठेचा इतिहास वाचून दाखवत अमोल कोल्हे यांना प्रत्युत्तर दिले.शिरूरसाठी महायुतीचे सरकार येणार असल्याचा विश्वास अजित पवार करत. “महायुतीचा आमदार निवडून दिल्यास शिरूरच्या प्रत्येक समस्येवर तोडगा काढू,” असे पवारांनी सांगितले. या सभेनंतर शिरूरमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून माऊली कटके यांच्या विजयाचे पारडे चांगलेच जड झाले असून कार्यकर्त्यांसह नागरिकांमध्ये शिरूरमध्ये दादाचा वादा हटके… अजित पवारांचा विश्वास जिंकणार माऊली कटके असा अजित पवारांनी विश्वास व्यक्त केल्याने मतदार संघाचे वारे गुलाबी झाले असून माऊलींच्या विजयात मोलाची भूमिका बजावली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!