Latest Marathi News
Ganesh J GIF

महाराष्ट्रातही बिहारप्रमाणे ओबीसी समाजाचा डेटा तयार व्हावा

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी, ओबीसी जागर यात्रेचा सेवाग्राम येथून शुभारंभ

वर्धा दि २(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात ओबीसीसाठी स्वतंत्र मंत्रालय, ओबीसींना राजकीय आरक्षण देण्याचे व ते वाचविण्याचे काम श्री .देवेंद्र फडणवीस यांनी केले, तर केंद्रातील मोदी सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून ओबीसींचे हित साधले आहे. ज्याप्रकारे बिहारमध्ये सर्व समाजाचा डेटा तयार करण्यात आला. त्याच प्रकारे महाराष्ट्रातही ओबीसी समाजाचा डेटा तयार करावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याकडे करणार आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.

हिंगणघाट (जि. वर्धा) येथे ओबीसी जागर मेळाव्यात ते बोलत होते. भाजपाच्या ओबीसी जागर यात्रेची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी सेवाग्राम आश्रम येथून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवी झेंडी दाखवून केली. सेवाग्राम येथून सुरू झालेली ही यात्रा पहिल्या टप्प्यात १६०० किमीचा प्रवास करणार आहे. विदर्भातील ९ लोकसभा क्षेत्रातून ही यात्रा ओबीसींसाठी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा जागर करणार आहे. शेतकऱ्यांचे हित साधले जावे, युवकांना रोजगार मिळवा, महिलांचे कल्याण व्हावे आणि ओबीसीमध्ये सामील असणाऱ्या १८ पगड जाती, १२ बलुतेदार व ३५० हून अधिक उपजातींना न्याय मिळवून देण्याचे काम जागर यात्रा करेल असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला. मेळाव्यापूर्वी बावनकुळे यांच्या उपस्थितीत ८०० बाईकची भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीने हिंगणघाटचे लक्ष वेधून घेतले. मेळाव्यानंगतर जागर यात्रा देवळी, कळंब, यवतमाळ मार्गाने पुढे निघाली. पंतप्रधान मोदी यांनी ओबीसी समाजातील घटकांना नीटच्या माध्यमातून मेडिकल शिक्षण, केंद्रीय नवोदय विद्यालय, सैनिक शाळा, आर्थिक उत्थानासाठी वेंचर कॅपिटल योजना, किसान सन्मान निधीच्या माध्यमातून उत्थानासाठी काम केले. त्यांच्याच कार्यकाळात भारत चंद्रावर पोहचला, सूर्याकडे जातो आहे. मोदींचा पराभव करण्यासाठी २८ विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. जेव्हा जनतेला विकास सांगता येत नाही तेव्हा संभ्रम निर्माण करण्याचे काम कॉंग्रेसकडून केले जाते. कॉंग्रेस सरकारने कधीही ओबीसी समाजाला न्याय दिला नाही, अशी टिका बावनकुळे यांनी केली.

हिंगणघाट येथील ओबीसी जागर मेळाव्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस व सुवर्णकार समाजाचे नेते सुभाष निनावे यांच्यासह मोठ्या संख्येने युवकांनी व इतर कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यांचे बावनकुळे यांनी पक्षात स्वागत केले व ओबीसी समाजासाठी काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!