Just another WordPress site

लग्न सोहळ्यावरुन आल्यानंतर या कारणाने विवाहितेचा मृत्यू

विवाहितेच्या मृत्यूचे कारण महाराष्ट्राची काळजी वाढवणारे, सर्वांनी काळजी घेण्याची गरज

जळगाव दि १३(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात गेल्या महिन्यात महाराष्ट्र भुषण कार्यक्रमात उष्माघाताने १४ जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. पण आता महाराष्ट्रातील वाढलेल्या प्रचंड तापमानामुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूमुळे राज्याची चिंता वाढली आहे.

GIF Advt

अवकाळीनंतर आता मे महिन्यात सूर्याने आग ओकायला सुरुवात केली आहे. त्यामुळे एका विवाहितेला आपला जीव गमावावा लागला आहे. रुपाली गजेंद्रसिंग राजपूत असे मृत महिलेचे नाव आहे. रुपाली ह्या अमरावती येथे एका विवाह सोहळ्यानिमित्त गेल्या होत्या. सोहळा आटोपून त्या गुरुवारी परत अमळनेर शहरात घरी परतल्या. घरी आल्यानंतर अचानक त्यांना मळमळ व उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी डाॅक्टरांनी त्यांना औषध देऊन प्राथमिक उपचार केले. पण काही वेळानंतर परत त्यांना त्रास सुरु झाल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले पण त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यू उष्माघातानेच झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.  शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. पण वाढत असलेले तापमान चिंतेचा विषय बनला आहे.

जळगाव जिल्ह्यामध्ये सध्या उष्णतेची लाट जाणवत आहे. सलग तीन दिवस जळगाव जिल्हा हा उष्णतेच्या बाबतीत देशात पहिला क्रमांक होता. गेले तीन दिवस जळगावात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. तब्बल ४५ डिग्री तापमानाची नोंद जळगावात करण्यात आली आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, आवश्यकता नसल्यास बाहेर फिरणे टाळावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!