Latest Marathi News
Ganesh J GIF

मुख्यमंत्र्यांची बैठक सुरू असताना अचानक निघाला साप

कार्यकर्त्यांची एकच धावपळ, सर्पमित्राने साप पकडल्याने सर्वांचा जीव भांड्यात

बंगळूरू दि १३(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी यंत्रणा कायम सतर्क असते. पण कधी कधी अशी स्थिती तयार होते की सर्वांची धावपळ होते. असेच कांहीसे चित्र कर्नाटकमध्ये पहायला मिळाले. मुख्यमंत्री एक बैठक घेत असताना अचानक साप निघाल्याने सगळ्यांची भंबेरी उडाली होती. पण सापाला पकडल्यानंतर सर्वांचा जीव भांड्यात पडला.

कर्नाटकात विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरु असून काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचं दिसत आहे. त्यानिमित्त भाजप विविध बैठका घेत इतर शक्यता तपासत आहे. भाजपा उमेदवार शिवराज सज्जन यांचा घरी एक बैठक घेतली जात होती. विशेष म्हणजे याठिकाणी बैठकीत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हेदेखील उपस्थित होते. यादरम्यान तिथे अचानक साप आढळला. साप दिसल्यानंतर एकच धावपळ सुरु झाली होती. काही वेळाने या सापाला पकडण्यात आलं आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र, बसवराज बोम्मई यांचा प्रवेश होण्याच्या दरम्यान, हा साप पुन्हा निसटला. त्यानंतर साप पुन्हा पकडण्यात आला आणि कार्यालयाचा परीसर सुरक्षत करण्यात आला. या सगळ्या गोंधळात साप पकडणारा एक जवान त्या ठिकाणी आला, त्यानं काठीनं नागाला गुंगवून शेपटीकडून नाग पकडला. जवान नाग जेव्हा बाहेर घेऊन गेला, त्यानंतर भाजपाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. याचा व्हिडिओ समोर आला आहे.

शिगगाव विधानसभा हा बसवराज बोम्मई यांचा मतदारसंघ आहे. त्यांची लढत काँग्रेसच्या यासिर हमेद यांच्याशी होते आहे. याच मतदारसंघातून मुख्यमंत्री बसवराज बोम्मई सलग चौथ्यांदा निवडणूक लढत आहेत. सलग तीनवेळा त्यांनी विजय मिळवला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!