Latest Marathi News
Ganesh J GIF

दिव्यांग निधीसाठी उपोषणाला बसलेल्या दोन चिमुकल्या भावंडाचा मृत्यू

अंत्यसंस्कर न करण्याची कुटुंबीयांची भूमिका, प्रशासनाची बेफिकीर वृत्ती

बार्शी दि ५(प्रतिनिधी) – दिव्यांग निधी मिळावा म्हणून तीन महिन्यांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी जवळील चिखर्डे ग्रामपंचायतीसमोर आई-वडिलांसोबत उपोषणाला बसलेल्या १३ वर्षीय वैष्णवी रामचंद्र कुरुळे हिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर संभव रामचंद्र कुरुळे या १० वर्षीय मुलाचा देखील या आंदोलनात मृत्यू झाला आहे. दिव्यांग निधीसाठी दोन चिमुकल्यांना आपला जीव गमावावा लागल्याने संताप व्यक्त होत आहे.

दिव्यांग बांधावासाठी असलेला निधी मिळाला नाही म्हणून चिखर्डे येथील रामचंद्र कुरुळे आणि त्यांचे कुटुंबीय १८ ऑगस्टपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. त्यांचे संपूर्ण कुटुंब अपंग असल्याने अपंग निधीसाठी त्यांनी उपोषण केले. मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे त्यांच्या मुलांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे मुलीचा मृत्यू झाला तेव्हा संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करू आणि रखडलेला निधी देखील १५ दिवसांत मिळवून देऊ असे आश्वासन कुरुळे कुटुंबाला देण्यात आले होते. त्यामुळे कुंटुंबीयांनी मुलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.पण आता मुलाचाही मृत्यु झाल्यामुळे कुटुंबीय दुखात आहेत. मात्र आश्वासनाची पूर्तता न झाल्याने कुरुळे कुटुंबीय पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली होती. गावातील स्मशानभूमीत कुरुळे कुटुंबीय उपोषणाला बसले होते. या उपोषणा दरम्यान रामचंद्र कुरुळे यांचा अवघ्या 10 वर्षाचा मुलगा संभव याचा देखील मृत्यू झाला. वैष्णवी आणि संभव या दोन्ही दिव्यांग भावंडांच्या मृत्युला प्रशासन जबाबदार असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी तोपर्यंत संभववर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका कुरुळे कुटुंबियांनी घेतली होती.

प्रशासनाने कोणतीही कार्यवाही न केल्याने चिखर्डेतील ग्रामस्थ देखील आक्रमक झाले आहेत. प्रहार अपंग संघटनेच्या जिल्हाध्यक्ष संजीवनी बारंगुळे यांनी अंगावर डिझेल ओतून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. राज्यात स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्याची घोषणा झाली असतानाच दोन दिव्यांग मुलांचा निधीसाठी आंदोलन करताना मृत्यू झाल्याने प्रशासनातील अपयश अधोरेखित झाले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!