Just another WordPress site

‘या बिल्डरच्या मदतीने एकनाथ शिंदे आमदारांना सुरत गुवाहाटीला घेऊन गेले’

यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ, भाजपावर साधला निशाना

मुंबई दि ५(प्रतिनिधी)- महाविकास आघाडी सरकारला सत्तेतून पायउतार करत सत्तेत आलेल्या शिंदे सरकारवर सत्तेच्या पहिल्या दिवसापासून विरोधक आणि ठाकरे गटाकडून टिका केली जात आहे.आता तर एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर ते आणि बंडखोर एका बिल्डरच्या मदतीने सुरतला गेले होते असा दावा केला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर एका प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिकाच्या मदतीने सर्व बंडखोर आमदारांना आधी सुरतला आणि तिथून गुवहाटीला नेण्यामागे या बांधकाम व्यवसायिकाचा हात होता असा, दावाही ठाकरेंच्या शिवसेनेने केला आहे. ठाण्यातील बांधकाम व्यवसायिक अजय आशर यांच्या नावाचा उल्लेख करत शिवसेनेने शिंदेंना लक्ष्य केले आहे. सामनाच्या अग्रलेखातून यावर लक्ष्य करण्यात आले आहे. शिंदे यांनी त्यांचे मित्र बिल्डर अजय आशर यांना महाराष्ट्रात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या ‘मित्र’च्या उपाध्यक्षपदी नेमणूक केली आहे, यातुन त्यांनी सुरत आणि गुवाहाटी दाै-याची परतफेड केली आहे असा देखील दावा शिंदे गटाने केला आहे. यावेळी भाजपाच्या दुपट्टी भुमिकेवरही टिका करण्यात आली आहे. आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री शिंदेवर टिका करताना नगरविकास मंत्रालयाचे सर्व निर्णय आशर घेतात अशी टिका केली होती. पण आता मात्र भाजपा गप्प बसली आहे म्हणत भाजपा दुहेरी भुमिका घेत असल्याचा आरोप केला आहे.

GIF Advt

आशर यांच्या गुजरात संबंधानेच महाराष्ट्रातील फुटीर आमदारांना सुरतचा मार्ग दाखवला. सुरतला ‘हिसाब-किताब’ झाल्यावरच गुवाहाटीला गेले. ही सर्व खोके व्यवस्था करणारे हे महाशय महाराष्ट्राच्या योजना आयोगाचे उपाध्यक्ष झालेत. हे जंतर-मंतर फक्त सध्याचे मुख्यमंत्री करू शकतात,” असा खोचक टोला ‘सामना’च्या अग्रलेखातून लगावला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!