Just another WordPress site

चालताना अचानक शिंक आल्याने तरूणाचा मृत्यू

तरूणाच्या मृत्यूची घटना सीसीटीव्हीत कैद, व्हिडीओ पाहुन थक्क व्हाल

मेरठ दि ५(प्रतिनिधी)- आजचा जमाना सोशल मिडीयाचा आहे. अशा या सोशल मिडीयावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. एका तरुणाला चालता चालता शिंक आली आणि तो जागेवरच कोसळला. त्याच्या या मृत्यूची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

शिंकेमुळे मृत्यू होण्याची घटना उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये घडली आहे.एका तरुणाला चालता चालता मृत्यू आल्याचा हा व्हिडीओ आहे. मुख्य म्हणजे चालताना या तरुणाला शिंक येत आणि त्यानंतर तो तिथेच कोसळून त्याचा जागीच जीव जातो. हे संपूर्ण प्रकरण मेरठच्या किडवाई नगरचे आहे. घडले असे की, शुक्रवारी २ डिसेंबर रोजी चार मित्र एका रस्त्यावरून जात होते. चौघेही आपापसात बोलत फिरत होते. दरम्यान, एका तरुणाला शिंक आली शिंक आल्यानंतर तरुणाने मित्राच्या खांद्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो घसरला आणि रस्त्यावर पडला. मित्रांनी मुलाचे हातपाय चोळण्यास सुरुवात केली. तसेच स्थानिकांच्या मदतीने रूग्णालयात दाखल करण्यात आले पण डाॅक्टरांनी तरूणाला मृत घोषित केले. चालता बोलता एक तरुण गतप्राण झाल्याने सारेच थक्क झाले. ही घटना एका सीसीटीव्हीत कैद झाल्याने तो व्हिडिओ व्हायरल होत आहे.

GIF Advt

तरुणाला हार्ट अटॅक आल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. मात्र यातील कोणत्याही गोष्टी अधिकृत माहिती अद्याप तरी देण्यात आलेली नाही. सोशल मिडीयावर काही व्हिडीओ माणसाला पोट धरून हासायला भाग पाडतात. तर काही वेळी काळजाचा ठोकाच चुकवतात.सध्या हा व्हिडिओ पाहुन अनेकांना धक्का बसला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!