Latest Marathi News
Ganesh J GIF

रामनवमीदिवशी मंदिरात विहिरीचे छत कोसळल्याने 13 भाविकांचा मृत्यू

अपघातात अनेकजण जखमी, सरकारकडून मदतीची घोषणा

इंदुर दि ३०(प्रतिनिधी)- आज देशभरात सगळीकडे रामनवमीचा उत्साह असतांना इंदरूमध्ये मात्र, एक मोठी दु:खद घटना घडली आहे. इंदूरमध्ये आज बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिरातील विहिरीचे छत कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत एकूण १३ भाविकांचा मृत्यू झाला असून कित्येक जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मंदिरात एक विहीर आहे, ज्यावर छत टाकण्यात आले होते. राम नवमीमुळे मंदिरात भाविकांची गर्दी होती. यावेळी अनेकजण या विहिरीच्या छतावर उभे होते. यावेळी अचानक हे छत कोसळले आणि त्यावर उभे असलेले लोक विहिरीत पडले. विहिरीत पडलेल्यांमध्ये महिला आणि मुलींचाही समावेश आहे. या घटनेनंतर स्थानिकांनी बचावकार्य सुरू केले, तसेच प्रशासनाचे बचाव पथकही दाखल झाले.25 ते 30 भाविक हे विहिरीत कोसळले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन, कलेक्टर, आणि इतर प्रशासकीय अधिकारी दाखल झाले होते. त्यानंतर तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आलं. पोलिसांनी आणि भाविकांनी रस्सीच्या मदतीनं जखमी भाविकांना विहिरीतून बाहेर काढलं. मात्र, या अपघातात एकूण १३ जणाचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये चिमुकल्या मुलांचाही समावेश असल्याची माहिती आहे. 13 मृतांपैकी सर्व महिला आहेत. दरम्यान, या दुर्घटनेत आणखी काही लोक जखमी आणि मृत्यू होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर १९ जणांना वाचवण्यात यश आले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे या प्रकरणावर लक्ष ठेऊन आहेत. त्यांनी ट्विट करुन या घटनेवर दुःख व्यक्त केले. तसेच, या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपये भरपाई देण्याची घोषणा केली आहे. तसेच, जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये दिले जातील. अजूनही बचाव कार्य सुरु आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!