या अभिनेत्रीला करायचेय लग्न? मेट्रोमोनियलवर अकाउंट
स्क्रिनशॉर्ट शेअर अभिनेत्रीने दिली माहिती, साॅफ्टवेअर प्रोफेशनचा उल्लेख, म्हणाली हिंमत....
मुंबई दि ११(प्रतिनिधी)- सध्या सिनेसृष्टीत लग्नाचे वारे वाहत आहे. त्यात बिग बॉस मराठीच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री वीणा जगताप चर्चेत आली आहे. वीणा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. नुकताच तिने केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे. ती लग्नासाठी आतुर असल्याची चर्चा आहे.
वीणाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने एक मेट्रोमोनियल साईटवरचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये वीणाचे मेट्रोमोनियल साईटवरील प्रोफाईल असल्याचे दिसतल आहे. विशेष म्हणजे वीणाचं हे फेक प्रोफाईल असून याविषयी तिने नाराजी व्यक्त केली आहे. त्यामध्ये एका चाहत्याने आपल्या निदर्शनास ही बाब आणून दिली असल्याचं म्हटलं आहे. लोकं असं का करतात? हेच आपल्याला ठाऊक नसल्याचं ते म्हणाले आहेत. मागील वर्षीही असा प्रकार घडला होता असेही तिनं म्हटलं आहे..माझा फॅन असणाऱ्या एका दादानं हा स्क्रिनशॉट मला पाठला आहे. लोक असं का करतात? हे मला कळत नाही. मॅट्रिमोनियल साईटवर खोटी माहिती. मी सॉफ्टवेअर प्रोफेशनल आहे याची मलाही कल्पना नाही. हे प्रोफाईल बनवणाऱ्या व्यक्तीच्या हिंमतीची मला दाद द्यावीशी वाटते. अशा खोट्या प्रोफाईलपासून सावध राहा.’ असे आवाहन तिने केले आहे. वीणा बिग बॉस मराठी या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सीझनमध्ये दिसली होती. त्यावेळी तिचे नाव शिव ठाकरेसोबत जोडण्यात आले होते. शो संपल्यावरही ते एकमेकांना डेट करत होते. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांचा ब्रेकअप झाला आहे.
वीणाने व्हॉट्स अॅप लग्न या चित्रपटात काम केले होते. तसेच ठिपक्यांची रांगोळी मालिकेत वीणानं अवंतिका ही भूमिका साकारली. वीणानं आनान या चित्रपटात देखील प्रमुख भूमिका साकारली होती. तसेच राधा प्रेम रंगी रंगली या मालिकेत देखील तिनं काम केल आहे. शिवाय वीणा ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.