Latest Marathi News
Ganesh J GIF

सोशल मीडियावर फोटो शेअर करणे दोघांना पडले महागात

पुणे : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तरुणांमध्ये चांगलेच लोकप्रिय झाले आहे. अनेक जण सोशल मीडियावर आपले अनेक फोटो टाकत असतात. परंतु सोशल मीडियावर फोटो टाकताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. कारण पुणे शहरातील दोन तरुणांना सोशल मीडियावर टाकलेल्या फोटोंमुळे कारागृहाची हवा खावी लागली.

राज्य पोलिसांचे लक्ष तुमच्या सोशल मीडिया अकांऊटवर असते. त्यामुळेगुन्हेगारीचे उद्दात्तीकरण करणारे फोटो दिसल्यास त्वरित कारवाई होत आहे.

काय आहे पुणे येथील प्रकार

पुणे शहरातील दोन तरुणांनी आपले फोटो सोशल मीडियावर टाकले. शस्त्रांसह त्यांनी हे फोटो शेअर केले. पोलिसांना हा प्रकार समजला. त्यानंतर अरशद शरीफ पटेल (वय २१) उमर सलमी शेख (वय १९) या दोन्हांना उरळी देवाची भागातून अटक करण्यात आली. हडपसर पोलिसांनी ही कारवाई केली.

पोलिसांचे ऑपरेशन अन्…

पुणे पोलिसांनी ८ जुलै रोजी कोम्बिंग ऑपरेशन राबवले होते. त्यावेळी पोलिसांना दोन तरुण शस्त्रांसह आपले फोटो शेअर करत असल्याची माहिती मिळाली. हडपसर विभागानेच पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांनी त्यांना अटक केली. त्यांची चौकशी केली असता लोकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी त्यांनी असे फोटो शेअर केल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्यांच्याकडून शस्त्र जप्त केले आहे.

कोयता गँगमुळे पोलिसांचे लक्ष

पुणे शहरात कोयता गँगचा धुमाकूळ सुरु आहे. यामुळे कोयता गँगचा निपटारा करण्यासाठी पोलिसांचे बारीक लक्ष गुन्हेगारांवर आहे. पुणे शहरात वाढलेली गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिसांचे अनेक प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी आयुक्त रस्त्यावर उतरले. अनेक गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!