‘तुमची मंत्रीपदे भाजपामुळेच आहेत हे विसरू नका!’
भाजपाने शिंदे गटाला पुन्हा एकदा सुनावले, भाजप शिंदे गटातील वाद पुन्हा चव्हाट्यावर?
नाशिक दि २१(प्रतिनिधी)- राज्यात भाजप व शिंदे गटाचे सरकार स्थापन होऊन वर्ष होत आले आहे. या वर्षभरात भाजपाचा वरचष्मा दिसून आला आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री हे पद शिंदे गटाला गेल्याचे दुख अजूनही भाजपाला विसरता आलेले नाही. त्यामुळे त्यांच्यात अनेकवेळा वादाचे प्रसंग घडत असतात. आताही शिंदे गटातील आणि भाजपमधील नेत्यांच्या कुरबुरी समोर येत आहेत.
नुकताच नाशिकमध्ये औद्योगिक प्रदर्शनाच्या उद्घाटनाचा सोहळा पार पडला. हा उद्घाटन सोहळा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांची उपस्थिती होती.या कार्यक्रमावेळी भाजपच्या आमदार सीमाताई हिरे यांना एका व्यक्तीचा धक्का लागून त्या खाली पडल्या. ज्या व्यक्तीचा धक्का लागल्याने त्या पडल्या त्या व्यक्तीने किंवा त्याठिकाणी उपस्थित असणाऱ्या कोणत्याही नेत्याने या घटनेची दखल घेतली नाही. यानंतर सीमा हिरे त्या कार्यक्रमातून निघून गेल्या. यामुळे संतापलेल्या अजित चव्हाण यांनी फेसबुक पोस्ट लिहित शिंदे गटाला इशारा दिला आहे. ‘नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांना आठवण करुन देतो की, त्यांची पदं भारतीय जनता पक्षामुळे आहेत.’ अशा थेट शब्दात सुनावण्यात आले आहे. सार्वजनिक जीवनात वावरणारे लोक किती उथळ झाले आहेत याचा अतिशय धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये पाहायला मिळाला भारतीय जनता पक्षाच्या आमदार ज्या सीमाताई हिरे यांना एका अतिशय अपमानस्पद प्रकाराला सामोरे जावे लागले सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ज्यांचा वावर अतिशय सौजन्यशील असतो. नाशिकच्या लोकप्रतिनिधींमध्ये सीमाताई या अतिशय सुसंस्कृत राजकारणी म्हणून सर्वसामान्यांना आपल्या वाटतात. अशा व्यक्तीचा झालेला अपमान नाशिककरांच्या जिव्हारी लागला आहे. औद्योगिक प्रदर्शनाच्या उद्घाटन वेळी उद्योग मंत्री उदय सामंत पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत धनंजय बेळे या कायम मिरवून घेण्यासाठी पुढे-पुढे करणाऱ्या व्यक्तीने सीमाताईंना मागून धक्का दिला आणि त्या पडल्या हे स्पष्ट व्हिडिओमध्ये दिसत आहे. अनावधानाने असं होऊ शकतं, कुणाचाही कुणालाही धक्का लागू शकतो इथपर्यंत सगळं ठीक आहे…पण आपल्यामुळे कुणीतरी पडलं त्याची माफी मागणं हे सौजन्य आहे ते साधं सौजन्यही न दाखवता उद्घाटनाच्या कार्यक्रमाला सरसवून फोटो काढून मिरवून घेण्यात हे धनंजय बेळे पुन्हा एकदा व्यस्त झाले… अशी मोठी पोस्ट चव्हाण यांनी लिहीली आहे.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid0QBXmxFaWXDMLURcaoHsEcNrogvXrnUpjprRKbAC1YZLDs8sHYE4KRtRdPrdj26Rjl&id=100001689265437&mibextid=ZbWKwL
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत ही नाराजी पोचवली जाईल त्यांनाही झालेल्या प्रकार आवडेल असं मला वाटत नाही राहिला प्रश्न धनंजय बेळे या व्यक्तीचा या प्रकाराला जबाबदार असणाऱ्या संस्कारहीन मिरवून घेण्याची हौस असणाऱ्या माणसावर नाशिककरांनी बहिष्कार घालण्याची गरज आहे, असे चव्हाण म्हणाले आहेत.