Just another WordPress site

समीर वानखेडेंनी शाहरुख खानकडून ५० लाखाची लाच घेतली?

शाहरुख खानच्या मॅनेजरमुळे समीर वानखेडे अडचणीत, आर्यनला सोडवण्यातही होता तिचा सहभाग

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- एनसीबीचे माजी प्रमुख समीर वानखेडेवर अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला वाचवण्यासाठी २५ कोटींची लाच मागून १८ कोटी रुपयांवर डीलची तयारी दर्शवली होती, अशी चर्चा आहे. त्यातच शाहरुखची मॅनेजर पुजा ददलानीमुळे वानखेडेंच्या अडचणी वाढल्या आहेत.


समीर वानखेडे यांच्याकडे एनसीबीच्या मुंबई विभागीय संचालकपदाची जबाबदारी असताना त्यांच्या पथकाने ऑक्टोबर २०२१ मध्ये कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकण्यात आला होता. या कारवाईत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ताब्यात घेण्यात आले होते. शाहरुख खानच्या मुलाला सोडवण्यासाठी समीर वानखेडे यांनी २५ कोटींच्या खंडणीची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर ही डील १८ कोटीला ठरवण्यात आली महत्वाचे म्हणजे तिने त्यातील डाऊन पेमेंट म्हणून ५० लाख रुपये दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यात शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी चा जुना जबाब समीर यांच्यासाठी सर्वात मोठी अडचण ठरला आहे. पूजाने दिलेल्या जबाबात खंडणी दिल्याचे मान्य केले होते. पूजाने जबाबात म्हटले होते की, या प्रकरणात त्यांनी टोकन मनी म्हणून ५० लाख रुपयांची बॅगही दिली होती. पूजाने स्वत:हे पैसे दिले नाहीत तर बॉलिवूडशी जवळीक असणाऱ्या वांद्रेतील एका राजकारण्याने तिच्यासाठी या रकमेची व्यवस्था केल्याचं म्हटले जात आहे.

GIF Advt


पूजा ददलानी २०१२ पासून पूजा शाहरुखची मॅनेजर आहे. पूजा शाहरुख खान चित्रपट मिळवून देण्यापासून ते त्यांच्या फीपर्यंतचे सगळे व्यवहार सांभाळते. शाहरुखच्या चित्रपटांपासून ते रेड चिलीज एंटरटेनमेंट या प्रॉडक्शन कंपनीपर्यंत पूजा सर्व काही पाहते. याशिवाय आयपीएल टीम केकेआरही पूजा सांभाळते. आर्यन खानला जामीन मिळेपर्यंत पूजा शाहरुखच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती आणि त्याच्यासाठी लढत होती.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!