Latest Marathi News
Ganesh J GIF

मंत्री अदिती तटकरेंच्या गाडीमध्ये सापडले कोट्यवधीचे ड्रग्ज?

निलंबित पोलीस अधिका-याचा मोठा गाैप्यस्फोट, फडणवीस ते खडसे सगळच काढल

मुंबई – निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले जामिनावर बाहेर आल्यापासून रोज नवनवे गाैप्यस्फोट करत आहेत. काही दिवसापूर्वी त्यांनी अजित पवार यांचा मुलगा जय पवार बाबत गाैप्यस्फोट केला होता. आता त्याने मंत्री अदिती तटकरे यांच्याबाबत मोठा गाैप्यस्फोट केला आहे.

रणजित कासले यांनी एक व्हिडिओ प्रसारित केला असून त्यात त्यांनी सुनील तटकरे आणि आदिती तटकरे यांच्यावर भाष्य केले आहे. कासले म्हणाले पहिल्या किंवा दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये मी मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात होतो. तेव्हा मी युनिफॉर्मवर ड्युटी करीत होतो. तेव्हा ड्रग्जच्या बाबतीत मला एक अनुभव आला होता. त्यामध्ये एवढ्या मोठ्या व्यक्तीचं नाव आहे, त्याचा कुणी विचारही करु शकणार नाही. यामध्ये काही बॉलिवूड कलाकार, पोलिस आणि राजकीय लोक अडकू शकतात. लॉकडाऊनध्ये मी एक गाडी अडवली होती. गाडीची तपासणी करत असताना गाडी चालक पळून गेला. मी सहा तास पाठलाग करुन पुन्हा ती गाडी पकडून आणली होती. ती एक लॅम्बोर्गिनी कार होती. त्यामध्ये कोट्यवधी रुपयांचं ड्रग्ज होतं. परंतु हे प्रकरण दाबण्यात आलं. त्या गाडीमध्ये एक कार्ड सापडलं होतं. ते एका आमदाराचं कार्ड होतं. आज ते मंत्री आहेत.. ते किंवी ती असू शकतात. अजित पवारांच्या पक्षाचा तो किंवा ती मंत्री आहे. पुढच्या व्हिडीओमध्ये कासले सांगतात की, मी जो फोटो दाखवला नव्हता, तो फोटो आदिती तटकरे यांचा आहे. तसेच या दाव्यानंतर माझा खून सुद्धा होऊ शकतो, अशी भिती रणजित कासले यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान यावर अजित पवार गट किंवा अदिती तटकरे यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धमकीवजा इशारा दिला आहे. अजित पवार माझ्या मागे लागले आहेत. शेवटचा पत्ता मी पण ठेवलाय. मी जय पवारला कोणत्या हालतमध्ये सोडलंय, स्टेशन डायरी माझ्याकडे आहे. प्रिंटमध्ये-फोटोमध्ये आहे. गरज लागली की एक-एक पत्ता ठेवायचा, सगळंच देऊन मोकळं व्हायचं नाही, असं सूचक वक्तव्य सुद्धा रणजित कासले यांनी त्या प्रकरणाबाबत केल आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!