Just another WordPress site

लग्नाला नकार देणा-या प्रियकराचा ओढणीने आवळला गळा

विवाहित असूनही प्रियकराकडे लावला लग्नाचा तगादा

मुंबई दि १ (प्रतिनिधी) – लग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराचा महिलेने रिक्षातच ओढणीने गळा आवळून खून केल्याची घटना मुंबईत घडली आहे. रमजान शेख असे हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी जोहरा शाह या महिलेला अटक केली आहे.

GIF Advt

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार जोहरा शाह हिचं याआधी एका व्यक्तीबरोबर लग्न झाले होतं. तिला सहा मुलं आहेत. मात्र नंतर पती-पत्नीत वाद झाला आणि जोहराने पतीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ती रमजान खानसोबत लिव्ह-इन मध्ये राहू लागली होती. तिला रमजानसोबत लग्न करायचं होते. सुरुवातीला रमजाननेही लग्न करण्यास होकार दिला होता. मात्र नंतर तो सतत लग्नाबाबत टाळाटाळ करू लागला. यातूनच दोघांमध्ये वस्तू होत होता. हा वाद सोडवण्यासाठी दोघेही शनिवारी पोलीस ठाण्याकडे निघाले होते. मात्र अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर रमजानने पोलिसांकडे जाण्यास नकार दिला. त्यामुळे जोहराने आपल्या ओढणीने गळा आवळत त्याची हत्या केली. आणि स्वत पोलीस स्टेशन मध्ये जात खुनाची कबुली दिली.

वर्षभरापासून जोहरा शाह आणि रिक्षाचालक असलेला तिचा प्रियकर रमजान शेख हे दोघे लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये होते.पवई पोलिसांनी जोहराला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!