Just another WordPress site

मद्यधुंद कार चालकाचा नाशिकच्या रस्त्यावर धिंगाणा

मद्यपीचा कारनामा सीसीटीव्हीत कैद, पोलीसांचीही उडाली धांदल

नाशिक दि १९(प्रतिनिधी)- एका मद्यधुंद बेदराकर कारचालकाला नाशिकमध्ये पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले आहे. नाशिकमध्ये एका मद्यधुंद कार चालकाने चार ते पाच जणांना उडवल्याची घटना घडली आहे. पोलिसांची मात्र चांगलीच दमछाक झाली. याचा व्हिडीओही जोरदार व्हायरल झाला आहे.

या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे. साहेबराव निकम अस त्या मद्यधुंद कारचालकाच नाव आहे. सीसीटीव्ही मध्ये हे कार वाहनांना धडक देत असल्याचे दिसत आहे. पोलीस त्या वाहन चालकाला पकडण्याचे प्रयत्न करताना दिसत होते. नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या उपनगर वरून लेखानगर आणि त्यानंतर लेखानगर कडून मुंबई नाक्याकडे भरधाव वेगाने येत असताना या कार ने चार ते पाच जणांना धडक दिली होती. ही घटना नाशिकमधील मुंबई नाका आणि अंबड या दोन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ कार चालकास ताब्यात घेतले. या घटनेत एका गंभीर जखमी व्यक्तीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर इतर दोघांना खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एका मद्यधुंद चालकाची चुकीचे इतर दोघांच्या मुळावर आली आहे.धक्कादायक म्हणजे मद्यधुंद कार चालक हा शिक्षक असल्याचे समोर आले आहे.

GIF Advt

नाशिक पुणे महामार्गावरून लेखानगर आणि लेखानगरकडून मुंबई नाक्याकडे भरधाव वेगाने ही कार आली. या कारने चार ते पाच जणांना उडवले. माहिती कळताच पोलिसांनी या कारचा वेगाने पाठलाग करत कारचालकाला ताब्यात घेतले. साहेबराव निकम याच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांचा अजून जबाब घेण्यात आलेला नाही.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!