पुणे दि १९(प्रतिनिधी)- वीस वर्षाच्या तरुणीसोबत मैत्री करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. पीडित तरुणी गरोदर राहिल्यावर हा प्रकार समोर आला आहे. तरुणावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार खराबवाडीत एप्रिल २०२२ मध्ये घडला होता.

कोमल कांत असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी आरोपीवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने एप्रिल मध्ये रात्रीच्या सुमारास संबंधित तरुणीस फोन केला आणि आपण कुठेतरी फिरायला जाऊ असे सांगत तिला घेऊन तो चाकण तळेगाव मार्गावर इंडियन ऑईल पेट्रोल पंपाच्या मागे असणाऱ्या निर्मनुष्य रस्त्यावर नेले. त्या ठिकाणी शेतात नेऊन तरुणीच्या इच्छेविरोधात तिच्यावर बलात्कार केला. तरुणी आठ महिन्याची गरोदर राहिल्याने तिने तरुणाला फोन करुन लग्नाबाबत विचारणा केली. त्यावेळी त्याने लग्न करण्यास नकार दिला.
तरुणी आठ महिन्याची गरोदर राहिल्याने तिने तरुणाला फोन करुन लग्नाबाबत विचारणा केली. त्यावेळी त्याने लग्न करण्यास नकार देऊन मोबाइल बंद ठेवल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक दत्तात्रय जाधव करत आहेत.