मुलीची छेड काढल्याच्या वादातून दोन गटात जोरदार हाणामारी
हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
कल्याण दि १९ (प्रतिनिधी)- मुलीची छेड काढल्याचा वादातून दोन गटात जोरदार राडा झाल्याची धक्कादायक घटना कल्याणमधील आंबिवली परिसरात काल रात्रीच्या सुमारास घडली. या राड्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. यानंतर कल्याण खडकपाडा पोलिसांनी केला सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
कल्याण जवळील आंबिवली परिसरात काही दिवसांपूर्वी एका मुलीची छेड काढल्याचा आरोप एका गटाने दुसऱ्या गटातील मुलावर केला होता. याच कारणावरून काल रात्रीच्या सुमारास या दोन्ही गटात रात्रीच्या सुमाराचा वाद सुरू झाला. काही वेळातच या वादाचं पर्यावसन हाणामारीत झालं. दोन्ही गटात तुफान हाणामारी झाली. या राड्यामुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार आंबिवली परिसरातील इराणी वस्तीतील एक महिला गावातील एका हॉटेलमध्ये जेवायला आली होती. यावेळी हॉटेलबाहेर असलेले काही तरुण आपल्याकडेच बघून काहीतरी बोलत आहेत, असा संशय महिलेला आला. तिने याबाबत पतीला आणि कुटुंबीयांना माहिती दिली. यानंतर यानंतर गावातील एक गट आणि इराणी वस्तीतील एक गट यांच्यात जोरदार हाणामारी झाली. घटनेची माहिती मिळताच खडकपाडा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. पोलीसांनी मोहम्मद इराणी, हुसेन इराणी, अब्बास इराणी यांच्यासह वैभव पाटील व त्याचा दोन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सध्या याप्रकरणी कल्याण झोन ३ चे डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी उमेश माने पाटील, खडकपाडा पोलीस ठाण्याचे सीनियर पीआय सर्जेराव पाटील आणि क्राईम पीआय शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली तीन विविध टीम या प्रकरणाचा तपास करत आहेत.