राहुल गांधीना दिलासा नाकारत सुरत न्यायालयाचा धक्का
शिक्षेविरोधात दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली, गांधी काय करणार?
सुरत दि २०(प्रतिनिधी)- काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सूरत कोर्टाकडून पुन्हा एकदा झटका बसला आहे. मोदी आडनाव प्रकरणात सूरत कोर्टाने राहुल गांधी यांचा स्थगिती अर्ज फेटाळला आहे. सूरत सत्र कोर्टाकडून राहुल गांधी यांना दिलासा मिळालेला नाही. राहुल गांधी यांची शिक्षा कायम राहणार असल्याचा निर्णय कोर्टाने दिला आहे.
राहुल गांधींच्या याचिकेवर सूरत कोर्टात सुनावणी झाली. मात्र, कोर्टाकडून गांधीना कोणताही दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे राहुल गांधी यांची शिक्षा कायम राहणार आहे. २०१९ मध्ये मोदी आडनावावरून केलेल्या वक्तव्या प्रकरणी राहुल गांधी यांना सूरत कोर्टाने २३ मार्चला दोषी ठरवले होते. त्यांना २ वर्षाची शिक्षा झाल्याने त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, राहुल यांनी याचिका फेटाळल्याने राहुल गांधी यांना खासदारकी परत मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आता राहुल गांधी हे उच्च न्यायालयात अपिल करणार आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी राहुल गांधी कर्नाटक दौऱ्यावर होते. कोलार येथील एक सभेत बोलताना ‘सर्व चोरांची आडनावं मोदी कशी काय असतात?’ असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केला होता.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी केरळमधील वायनाडमधून खासदार झाले. भाजपचे आमदार पूर्णेश मोदी यांनी दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात सुरतच्या एका न्यायालयाने राहुल गांधींना २३ मार्च रोजी दोषी ठरवून दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावल्यानंतर, त्यांचे लोकसभेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.