Latest Marathi News
Ganesh J GIF

मिस युनिव्हर्स असलेल्या अभिनेत्रीला आला हार्ट अटॅक

सोशल मीडियावरील पोस्टमुळे सर्वांनाच धक्का, झाली अँजिओप्लास्टी

मुंबई दि २(प्रतिनिधी)- बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनला नुकताच हृदयविकाराचा तिव्र झटका आल्याची माहिती तिनेच खुद्द सोशल मीडियावर शेअर केली आहे.तसेच तिची अँजिओप्लास्टी करण्यात आली असून त्यात स्टेंट टाकण्यात आला आहे.


या बातमीने तिच्या चाहत्यांना हादरवून सोडले आणि सर्वजण तिला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत. अभिनेत्रीने तिच्या वडिलांसोबतचा एक फोटो शेअर करत अभिनेत्रीने लिहिले की, तुमचे हृदय मजबूत आणि आनंदी ठेवा. तुमच्या वाईट काळात तो नेहमी तुमच्या पाठीशी उभा राहील. जेव्हा तुम्हाला त्याची सर्वात जास्त गरज असते. ही ओळ माझ्या वडिलांनी सांगितली होती. दोन दिवसांपूर्वी मला हृदयविकाराचा झटका आला होता. माझी अँजिओप्लास्टी झाली. माझी प्रकृती पूर्णपणे ठीक आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझे हृदय खरोखर मोठे असल्याचे माझ्या हृदयरोगतज्ज्ञांनी सांगितले आहे. मी त्या सर्व लोकांचे आभार मानू इच्छिते ज्यांनी मला वेळेवर रुग्णालयात नेले. त्याच्या तत्पर कारवाईमुळे मी सावरू शकले. त्यांच्याबद्दलही मी पुढच्या पोस्टमध्ये सांगेन. ही पोस्ट माझ्या चाहत्यांसाठी आहे. मी पूर्णपणे ठीक आहे ही चांगली बातमी शेअर करण्यासाठी, ही माझी पोस्ट होती. असे सुष्मिता म्हणाली आहे.

मिस युनिव्हर्स असलेल्या सुष्मिता सेनने ‘बीवी नंबर 1’, ‘डू नॉट डिस्टर्ब’, ‘मैं हूं ना’, ‘मैने प्यार क्यूं किया, ‘तुमको ना भूल पायेंगे’ आणि इतर चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने आंतरराष्ट्रीय एमी-नॉमिनेटेड मालिका ‘आर्या’ द्वारे तिने पुनरागमन केले तसेच शोच्या दुसऱ्या सीझनमध्ये देखील काम केले, चाहते आता तिच्या तिसऱ्या भागाची वाट पाहत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!