राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस
गैरव्यवहार प्रकरणी या दिवशी चौकशीला हजर राहण्याचे आदेश, निकालादिवशीच नोटीस योगायोग?
मुंबई दि ११(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जाणारे जयंत पाटील यांना ईडीने नोटिस बजावली आहे. आयएल ॲंन्ड एफसी कंपनीप्रकरणात जयंत पाटील यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. सोमवारी त्यांना चौकशी साठी हजर राहण्यास सांगितले आहे.
एकीकडे आज महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निकाल येणार आहे. तर त्याच्या काही तास अगोदर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना ईडीची नोटीस येणे हा योगयोग असेल का असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. आयएल आणि एफएलएसच्या माध्यमातून अनेकांनी आर्थिक मोठा गैरव्यवहार केला असल्याचा आरोप होता. त्याप्रकरणीच जयंत पाटील यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटिसीवर जयंत पाटील नेमकी काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल. दरम्यान आयएल अॅंड एएसकडून एका कंपनीने कर्ज घेतलं होत. या कंपनीचं कनेक्शन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांशी असल्याचं बोललं जात आहे. याच कारणामुळे त्यांना ईडीने चौकशीसाठी बोलावलं आहे. या कंपनीने २०१९ मध्ये दिवाळखोरी जाहीर केली होती. तर लोकांच्या पैशांचं मनि लॉन्ड्रींग केल्याचा आरोप आहे. तर याच प्रकरणात राज ठाकरे यांची देखील चौकशी झाली होती. या प्रकरणात सर्वप्रथम दिल्लीतील आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर या आर्थिक गैरव्यवहाराची व्याप्ती पाहता हे प्रकरण सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीकडे सोपवण्यात आले होते. राष्ट्रवादीला शह देण्यासाठी ही नोटीस बजावण्यात आल्याची चर्चा आहे.
यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ आणि अनिल देशमुख ईडीच्या रडारावर होते, ईडीचा वापर सातत्याने विरोधकांवर केला जात आहे असा आरोप सातत्याने होत आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांना ईडीची नोटीस येणं हे काही नवीन राहिलेलं नाही. आता जयंत पाटील यांना सोमवारी चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.