Latest Marathi News
Ganesh J GIF

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे एकनाथ शिंदे सरकार वाचले

न्यायालयाचे राज्यपालांवर ताशेरे, गोगावले यांचीही निवड बेकायदेशीर, तो निर्णय अध्यक्षांचा

दिल्ली दि ११(प्रतिनिधी)- राज्यात आज सत्तासंघर्षाचा निकाल लागला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर १६ आमदार अपात्र ठरणार की शिंदे सरकार कायम राहणार याचे उत्तर मिळाले आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखील ५ न्यायमूर्तींचे घटनापीठाने या प्रकरणावर निकाल दिला आहे. या निकालात शिंदे सरकार वाचले आहे.

न्यायलयाने विधानसभा अध्यक्षांचा अधिकार ठरवणारे नवाब रेबिया प्रकरण सात जणांच्या घटनापीठाकडे देण्याचा निर्णय दिला आहे. तर १६ आमदार पात्र कि अपात्र याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांवर सोपवण्यात आला आहे. पण अध्यक्षांचा निर्णय मोठ्या घटनापीठाकडे सोपवल्यामुळे याचा निकाल लांबण्याची शक्यता आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गटाचे भरत गोगावले यांना व्हिप म्हणून विधानसभाध्यक्षांनी मान्यता देणे बेकायदा असल्याचे महत्वाचे आदेश न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची नियुक्ती न्यायालयाने घटनाबाह्य ठरवली आहे. हा शिंदे गटाला मोठा धक्का आहे. त्यामुळे पहिला दोन घटना ठाकरे गटाच्या बाजूने अपेक्षित अश्या आलेल्या आहेत. त्याचबरोबर आम्हीच खरी शिवसेना हा शिंदे गटाचा दावा न्यायालयाने अमान्य केला आहे.शिंदे गटाने केवळ कारवाई वाचवण्यासाठी शिवसेना आमची हा दावा शिंदे गटाने केला होता तो अमान्य करण्यात आला आहे. त्यसचबरोबर राज्यपालांनी बोलवलेले अधिवेशन देखील घटनाबाह्य ठरवण्यात आला आहे. अविश्वास प्रस्ताव आला नसतानाही राज्यपालांनी तो निर्णय का घेतला असा सवाल न्यायालयाने विचारण्यात आला आहे. त्यामुळे न्यायालयाने राज्यपालांचे सर्व निर्णय चुकीचे होते असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे शिंदेच्या अडचणी वाढल्या आहेत. न्यायालयाने फडणवीसांना देखील फटकारले आहे. पण महत्वाचे म्हणजे उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर ठाकरे यांना परत मुख्यमंत्री करता आले असते असे न्यायालयाने म्हटले आहे.

पण या सर्व घडमोडी घडत असताना न्यायालयाने सरकारला मात्र धक्का नसल्याचे म्हटले आहे. आता अध्यक्ष नेमका अपात्रतेबाबत कोणता निर्णय घेणार हे महत्वाचे ठरणार आहे. पण उद्धव ठाकरेंचा राजीनामा चुकीचा ठरला असे न्यायालयाने मत नोंदवले आहे. त्यामुळे ठाकरेंचा पराभव झाला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!