‘सामाजिक परिवर्तन होणार नसेल तर शिक्षणाला अर्थ नाही’
खासदार सुप्रिया सुळे यांची ती पोस्ट व्हायरल, आपल्या कृतीतुन दिला सामाजिक संदेश
इंदापूर दि १९(प्रतिनिधी)- बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी वरकुटे बुद्रुक गावाला भेट दिली. त्याठिकाणी पतीनिधनानंतर एकल झालेल्या सुलन सुदाम देवकर,सारिका महेश चितळकर,सोनाली राजेश गायकवाड, कल्पना शशिकांत चव्हाण आणि आशा अमोल पोळ या भगिनी त्यांना भेटल्या.
समाजातील प्रत्येक व्यक्तीला, मग ती स्त्री असो की पुरुष, आपल्या संविधानाने सन्मानाने जगण्याचा हक्क दिला आहे, असे सांगत खासदार सुळे यांनी पतीनिधनानंतर कोणत्याही महिलेला समाजाने पुर्वीइतक्याच सन्मानाने वागविले पाहिजे, अशी भावना व्यक्त केली आणि त्या सर्व महिलांना कुंकू लावले.
आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील वरकुटे बुद्रुक ता. इंदापूर येथे पतीच्या निधनानंतर एकल झालेल्या सुलन सुदाम देवकर, सारिका महेश चितळकर, सोनाली राजेश गायकवाड, कल्पना शशिकांत चव्हाण आणि आशा अमोल पोळ या भगिनींची दौऱ्यावर असताना भेट झाली. समाजातील प्रत्येक व्यक्तीला, मग ती स्त्री असो… pic.twitter.com/JoPbsV1jcG
— Supriya Sule (@supriya_sule) May 19, 2023
अतिशय भावूक करणारा तो प्रसंग होता. सामाजिक परिवर्तन होणार नसेल तर शिक्षणाला अर्थ नाही, असे सांगत सुळे यांनी यावेळी एकल महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी आणि अनिष्ट प्रथा मोडून काढण्यासाठी आपण सर्व सुशिक्षित नागरीकांनी पुढाकार घेतला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.